मुंबई : वाजत या… गर्जत या… गुलाल उधळत या अशी मेघगर्जना करीत शिवतिर्थावरील दसरा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवतिर्थावरील दसऱ्याचा वारसा यंदाही उद्धव ठाकरेंची शिवसेनाच चालवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवतिर्थावर दसऱ्याला आवाज ठाकरेसेनेचाच असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने यंदा शिवतिर्थावरील दावा सोडत आझाद मैदना आणि बीकेसीचा पर्याय निवडला आहे.
यंदाच्या दसऱ्या मेळावाल्या वेगळं महत्व आहे. एन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा दसरा मेळावा येत असल्याने कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख महेश सावंत यांना आठ महिन्यापुर्वी फिल्डींग लावली होती. गेल्या लोकसभा निवडणूकीच्या सांगता सभेला एनवेळी शिंदेसेने बाजी मारत मोदींची सभा शिवतिर्थावर घेतली होती. त्यामुळे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
ऐनवेळी परवानगी मिळण्यात गडबड होऊ नये, यासाठी स्थानिक महापालिका प्रशासन कार्यालयाकडे महेश सावंत आणि पक्षाकडून जोरदार पाठपुरावा सुरू होता.
शिंदेसेनेनं दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवले आहेत. बीकेसी आणि आझाद मैदान शिंदेसेनेनं आरक्षित केलेलं आहे. यातील बीकेसीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. याआधी शिंदेसेनेचा मेळावा बीकेसीत झालेला आहे. बीकेसी प्रवासाच्या दृष्टीनं अधिक सोयीस्कर आहे. या भागात पार्किंगचा प्रश्न फारसा येत नाही. शिवसैनिकांना येण्याजाण्यासाठी बीकेसी अधिक सुलभ आहे. त्यामुळे बीकेसीची निवड दसरा मेळाव्यासाठी केली जाण्याची शक्यता अधिक आहे.
लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेनं १५ जागा लढवत ७ जागा जिंकल्या. तर ठाकरेसेनं २१ जागा लढवत ९ जागांवर बाजी मारली आहे. त्यातच मुंबई विधान परिषदेपाठोपाठ, शिक्षक मतदार संघ आणि आता मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीतही दहाच्या दहा जिंकल्यामुळे ठाकरे सेनेचे मनोबल उंचावले आहे. त्यात दसऱ्या मेळाव्याची भर प़डल्यास त्याचा मुंबईतील विधानसभेच्या निवडणूकीवर परिणाम होऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबईतील एकुण ३६ जागांपैकी त्यावेळी भाजपाने १६, शिवसेनेने १५, काँग्रेसने ३ तर राष्ट्रवादीने १ आणि एक जागा इतरांनी जिंकली होती.
लोकसभेतील निवडणूकीच्या निकालामुळे यंदाच्या निवडणूकीत मुंबईत शिवसेना फुटीचा फटका सर्वाधिक भाजपाला बसेल असे दिसतेय. या निवडणूकीत एकत्रित शिवसेनेला १९ टक्के मत पडली होती. त्यातील निम्मी मते पकडली आणि त्यात
कारण या निवडणूकीत काँग्रेसची १५ टक्के मते आणि फुटलेल्या राष्ट्रवादीची १८ पैकी निम्मि ९ टक्के मते पकडली तर ठाकरेंच्या शिवसेनेला ३१ टक्के मत पडतील असा अंदाज आहे. त्यात मुस्लिम आणि सुष्मा अंधारे तसेच प्रकाश आंबेडकरांसोबत लोकसभेसारके पडद्यामागे हितगुज जमल्यास शिवसेना मुंबईत चमत्कार करू शकेल. लोकसभेला प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या उमेदावाराविरोधात तीन ठीकाणी कमजोर असे मुस्लीम उमेदवार दिले होते. त्याचा फटका राहुल शेवाळे, मिहीर कोटेचा यांना बसला होता.
