ठाणे : श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे श्री जानकादेवी मंदिर, वर्तक नगर, पोखरण रोड नं. 1 व 2, ठाणे (प.) येथे प्रति वर्षाप्रमाणे ग्रामदेवता श्री जानकादेवीच्या पुरातन मंदिरात 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना, सकाळी 7 वा. पुजा, आरती इ. धार्मिक कार्यक्रम, सायं. ठिक 6.30 वा. श्री देवीची पालखी दिंडी, टाळ, मृदुंग, भजन, अभंगाच्या गजरात मंदिर परिसरात भक्तांच्या दर्शनासाठी आयोजित केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी अष्टमी प्रित्यर्थ सकाळपासून नवचंडी होम हवन, कुष्मांड बळी, महाआरती त्यानंतर प्रसाद, धार्मिक कार्यक्रम व रात्री प्रसिद्ध गोंधळी दत्तोबा वाईकर यांचा गोंधळ तसेच शब्दवेधचा कार्यक्रम होईल. 12 ऑक्टोबर रोजी दसरा दिनी दुपारपासून प्रसाद वाटप करण्यात येईल. श्री जानकादेवीची महाआरती रोज सायं ८ वा. होईल.
या कार्यक्रमांशिवाय रोज सत्पशती पाठ वाचन, पूजा, आरती भजन व किर्तन इत्यादी धार्मिक कार्यकमांचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकांनी सहकुटुंब, मित्र मंडळीसह अगत्य येऊन देवीच्या दर्शनाचा व इतर मंगल कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात आले आहे.
