स्पर्धकांचा महाकाय पक्ष्याच्या आकाराच्या मानवी प्रतिमा तयार करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न

हैदराबाद : भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, MEIL (Megha Engineering & Infrastructure Limited) आणि सुधा रेड्डी फाऊंडेशन यांनी 29 सप्टेंबर रोजी हैदराबाद मधील गचीबोवली स्टेडियम संकुलात मेगा मॅरेथॉन, पिंक पॉवर रन 2024 चे आयोजन केले होते. सामान्य लोकांच्या मनातील स्तनाच्या कर्करोगाविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जेणे करून या संदर्भात लवकर निदान आणि उपचार त्या रोग्यावर झाल्यास त्यांना रोगमुक्ती मिळू शकेल.

पिंक पॉवर रनमध्ये 3, 5 आणि 10 किमी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. न्याहारी, मॅरेथॉन किट आणि व्यायामाची माहिती स्पर्धेपूर्वी स्पर्धकांना देण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी होते. MEIL चे व्यवस्थापकीय संचालक पी.व्ही. कृष्णा रेड्डी, सुधा रेड्डी, आरोग्य मंत्री दामोदर राजनरसिंह यांच्याबरोबर त्यांनी पिंक पॉवर रनमधील विजेत्यांना पुरस्कार आणि पदके प्रदान केली.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे हजारो लोकांनी एकत्र येऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केला. स्पर्धकांनी कत्रितपणे एक विशाल पक्षी-आकाराची मानवी प्रतिमा तयार केली जी एकता, आशा आणि दृढनिश्चय यांचे प्रतिनिधित्व करत होती. या प्रतिमेतल्या पक्षाचे पंख हे स्तनाचा कर्करोगातून वाचलेल्यांची लवचिकता आणि ताकद दर्शवतात आणि ते स्वातंत्र्य आणि उड्डाणाचे प्रतीक आहेत असे या प्रसंगी आयोजकांनी सांगीतले.

या प्रसंगी बोलताना सुधा रेड्डी म्हणाल्या, “पिंक पॉवर रन ही केवळ एक शर्यत नाही; कॅन्सरग्रस्तांच्या प्रेरणादायी कथा जनसामान्यापर्यंत पोहचवत असताना , सामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहित करणे हे याचे उदिष्ट होते. एमईआयएल ही एक फक्त कॉर्पोरेट संस्था नसून जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा कंपनी तिथे कायमच मदतीला उभी ठाकते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *