केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा स्वपक्षाला टोला
नागपूर : सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. सरकारी अनुदानाची शाश्वती नाही, लकाडक्या बहिनीला पैसे द्यावे लागतात, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाला लगावल्याने माध्यामात ही बातमी दिवसभर ब्रेकींग न्युजम्हणून व्हायरल झाली. ते नागपूर विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने आयोजित केलेल्या “अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम” या सेमिनार मध्ये ते बोलत होते.
विदर्भाला नैसर्गिक एडवांटेज आहे. विदर्भात चांगले आणि मोठ्याप्रमाणात जंगल आहे. मात्र विदर्भात पर्यटन वाढीसाठी प्रमुख समस्या म्हणजे विदर्भातील गुंतवणूकदार हे आहेत. गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदार समोर येत नसल्याचे मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावे लागतं, असेही गडकरी यावेळी म्हणाले. सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच, असा मिश्किल टोलाही गडकरींनी यावेळी लगावला. तुम्ही या सर्व लफड्यात पडू नका, ही सबसिडी घ्यायची आहे, ती घेऊन घ्या. तसेच ती केव्हा मिळेल याचं काही भरवशा नाही. आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागेल असेही गडकरी मिश्किलपणे म्हणाले.
उपराजधानी नागपुरात एका आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ऑक्सीजन बर्ड पार्क नावाने साकारण्यात आले आहे.
एकूण 14.32 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास 20 एकरमध्ये साकारण्यात आला आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8 हजार 104 प्रकारच्या वनस्पतींसह ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात त्या भागातील नैसर्गिक तळ्यांनाही त्याच स्वरूपात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
ही तर गडकरींची मिश्किल स्टाईल आहे- देवेंद्र फडणवीस
“नितीन गडकरींची ती मिश्किल स्टाईल आहे. ही योजना बजेटच्या बाहेरची नाही. आमच्या सर्व योजना बजेटमध्ये आहेत. पगार किंवा इतर योजनांकरता अडचण नाही. हे सर्व पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले आहेत. आता विरोधकांच्या पोटात जोरात दुखायला लागल्याने ते रोज संभ्रम निर्माण करतात. काहीही बंद होणार नाही. सर्व चालणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.