Month: September 2024

‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये काल्हेर ग्रामपंचायत प्रथम

अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ठाणे जिल्हा कोंकण विभागात प्रथम; 4 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहिर झाला असून ग्रामपंचायत…

शेती उत्पादनवाढीसाठी सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेकरीता ८० लाखाचा निधी – रामेश्वर पाचे

ठाणे : शेतातील उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत ८० लाख निधी विविध सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधवाना या योजनेसाठी अर्ज करावे , असे आवाहन-कृषी विकास…

धनगरांचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास आदिवासींचा विरोध

आज ठाण्यात मोर्चा ठाणे : राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये,…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी सुनिल तटकरे

मुंबई : देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक…

 वक्तृत्व व निबंध प्रत्येक स्पर्धेत

 विद्यार्थ्यांनी मांडले स्वच्छता विचार   नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराचे भविष्य असणा-या नव्या पिढीच्या मनावर स्वच्छताविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीदशेपासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजविले जात आहेत. या माध्यमातून शहराचे भविष्य स्वच्छ व सुरक्षित केले जात आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली शालेय स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या अनुषंगाने नुकत्याच महापालिका शाळांप्रमाणेच खाजगी शाळांमध्येही वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपले विचार मांडले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरिता स्वच्छतेशी संबंधित विषय देण्यात आले होते. ज्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यापैकी एक विषय निवडण्याचा पर्याय होता. त्याचप्रमाणे इ.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता माझ्या स्वप्नातील शहर, स्वच्छतेतून समृध्दीकडे यापैकी एक विषय निवडायचा होता. तसेच इ.नववी – दहावी गटाकरिता ऊठ तरूणा जागा हो – स्वच्छतेचा धागा हो आणि स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता यापैकी एक पर्याय निवडण्याचे सूचित केले होते. या विषयांच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी 333 शाळांतील 10 हजार 512 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले स्वच्छताविषयक विचार मांडले. निबंध स्पर्धेतही नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांसोबत खाजगी 333 शाळांतील 10 हजार 426 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले स्वच्छता विचार शब्दांकित केले. विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छता कार्यात कसे योगदान देऊ शकतो याचा विचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वतीने अविष्कृत झाला. या स्पर्धांची तयारी करताना विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक व पालकही स्वच्छतेशी निगडीत स्पर्धेतील विषयांच्या अनुषंगाने स्वच्छतामय झाल्याचे चित्र शाळांमधून तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या घरांमधून बघावयास मिळाले. या स्पर्धांमधून केंद्रनिहाय प्रत्येक गटातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून निबंध स्पर्धेतील 30 व वक्तृत्व स्पर्धेतील 30 अशा बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी बारकाईने विचार केला व तो मांडला हे या स्पर्धा उपक्रमाचे यश असून याव्दारे नवी मुंबईतील घराघरांत स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत प्रसारित झाला. ००००

 महिलांनी आपले बँकखाते आधारकार्डशी संलग्न करण्याचे आवाहन

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या मुंबई :‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज पात्र असलेबाबत त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश (SMS) प्राप्त झाले आहेत. परंतू अद्यापपर्यंत योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न (आधारसीडेड) असल्याची त्वरित खात्री करून घ्यावी आणि आधार संलग्न केलेले नसल्यास संबंधित बँकेत जावून बँक खाते आधारकार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही त्वरित करून घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. ००००

ठाण्याचे कलावंत दत्तात्रय चिव्हाणे पुरस्काराने सन्मानित

ठाणे : मुंबई येथे नामांकित ओ. एन. सी. जी. कंपनीमध्ये कार्यरत असलेले ठाण्याचे  सुपुत्र  कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात…

डाक विभागाची नाळ सर्वसामान्यांची जोडलीय – न्या. ईश्वर सूर्यवंशी

ठाणे : डाक विभागासोबत सर्वसामान्यांची नाळ जोडली गेली आहे. पोस्टमन सामान्यांना आपल्या जवळचा आणि कुटुंबातील सदस्य वाटतो. याच पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सर्वसामान्यांना आपले वाटू लागले आहे. प्राधिकरणाचीही नाळ…

 लाभेश को. ऑप. हौ. सोसायटीच्या १३ वर्षांच्या लढ्याला यश

 इमारतीच्या बेसमेंट मधील दोन्ही बारला ठोकले सील ओसी मिळण्याचा मार्ग सुकर   ठाणे : तब्बल १३ वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश को. ऑप. हौ. सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश को. ऑप. हौ. सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडवून) ऐवजी श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आणि शितल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत २०११ पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत, दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीने अनेकदा दोन्ही बार मधील अनधिकृत, वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदला बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगर पालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सिल करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी (ता.२७) पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत, वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्रीदेखील केली होती. इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडावून) ऐवजी शितल बार (चंद्र शितल बार) व श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट (देवी दर्शन बार ॲण्ड रेस्टॉरंट) सुरू करून बारमधून तळमजल्यावर (दुकानाच्या रांगेत ११ नंबर गाळ्यात) जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत.  याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेने दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर प्रभाग समिती (सहायक आयुक्त) जा. क्र.८८५ च्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई केली. बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केल्या गेलेल्या खोट्या आरोपांना व आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिला आहे. त्याला आज यश मिळाले आहे, एवढे वर्ष एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती, अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोणाच्या आशीर्वादाने चालत होते याचाही पालिका प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावरही एमआरटीपी आणि इतर कलमांतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाश्यांकडून केली जात आहे. दरम्यान इमारतीमधील सोसायटीत चेरमेन, सेक्रेटरी आणि इतर विविध पदांवर काम करणारे दुलाजी लक्ष्मण लाड यांनी पदाचा गैरवापर करत बेसमेंटमध्ये बार सुरू करण्याची नियम बाह्य परवानगी आणि नाहरकत दिली. बारमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल केले. हे सर्व पालिका आणि मंजूर नकाशाच्या विरोधात असल्याने ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी त्यावेळेचे चेअरमन, सेक्रेटरी दुलाजी लाड यांच्यावर मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत, वाढीव आणि वापर बदल काम केल्याचा ठपका ठेवत एमआरटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापि दुलाजी लाड याच्यावर गुन्हा दाखल झाला नसून तो तत्काळ दाखल करावा अशी मागणी सोसायटीकडून केली जात आहे. तर पालिकेने वेळोवेळी केलेल्या अनधिकृत आणि वाढीव बांधकाम, वापर बदल यावर केलेल्या कारवाईमुळे सदर इमारतीला ओसी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून रहिवाशांचा १३ वर्षांचा वनवास संपणार आहे. 0000