Month: September 2024

२ ऑक्टोबर स्वच्छ दिवस मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड   अलिबाग : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ व २ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार १ ऑक्टोंबर रोजी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड तसेच पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणांची सामुहिक श्रमदानातून स्वच्छता करणे, तसेच नागरिकांना सामुहिक स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी परिसर स्वच्छता स्वच्छता विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तसेच २ आक्टोंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छ दिवस साजरा करण्यात येईल. त्यानुसार स्वच्छता हि सेवा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, व्यक्ती तसेच सफाई मित्रांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेमध्ये ओ.डी.एफ प्लस मॉडेल व्हीलेजाचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात येईल. स्वच्छ माझे अंगण अभियान मधील निकषपात्र कुटुंबाना सरपंच व ग्रामसेवक यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असून, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पुण्यातील शाळा क्षेत्रीय स्तरावर जाणार

भारत विकास परिषदेच्या प्रांतीय समुहगान स्पर्धा संपन्न पुणे : भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय समुहगान स्पर्धेत पुण्यातील एसपीएम इंग्रजी माध्यम शाळेने पहिला क्रमांक पटकावला असून या शाळेचा विजयी संघ आता भारत विकास परिषदेतर्फे होणाऱ्या समुहगान स्पर्धेत पुढच्या क्षेत्रीय फेरीसाठी बडोद्याला जाईल. स्पर्धेचे उद्घाटन करताना विख्यात उद्योजक उमेश राठी म्हणाले की समूहगान घेण्याचा उद्देष हा विद्यार्थ्यांयंमध्ये संघ भावना (टीम स्पिरिट) निर्माण करणे हा असून संस्कारक्षम वयात देशभक्ती रुजवणे हाही एक हेतू यातून साध्य होत असल्याने या स्पर्धेचे महत्व निराळेच आहे. प्रमुख पाहुणे दत्ताजी चितळे या वेळी म्हणाले की या स्पर्धांचा इतिहास हा लक्षणीय असून पुण्यातून निवडून गेलेले संघ क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरही चमकल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन्ही पाहुण्यांनी सर्व संघांना भरूपर शुभेच्छा दिल्या. भारत विकास परिषद दरवर्षी संस्कृत व हिंदी भाषेतील देशभक्तीपर समुहगीत गायनाच्या स्पर्धा भरवते. विविध शाखांतर्फे राज्याच्या सर्व भागात होणाऱ्या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत विजयी झालेले संघ प्रांतीय स्तरावरील स्पर्धेत दाखल झाले होते. एकूण बारा संघांनी यात सहभाग नोंदवला होता. कर्वे शिक्षण संस्थेच्या सभागृहात या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय स्पर्धा पार पडल्या. भारत विकास परिषदेच्या कोथरूड शाखेने स्पर्धेचे यजमानपद सांभाळले. या स्पर्धेत नासिक येथील विस्डम हाय इंटरनॅशनल शाळेने दुसरा तर पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद संपर्क, सहयोग, सेवा, संस्कार आणि समर्पण या पंचसूत्री वर काम करते. यात संस्कार या सुत्रला अनुसरून शाळांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने राष्ट्रभक्ती पर सामुहगान, भारत को जानो (प्रश्नमंजुषा) आणि गुरू वंदन छात्र अभिनंदन असे कार्यक्रम घेतले जातात. संगीत क्षेत्रातील जाणकार सुश्री घुगरी, राजे व साठे यांनी परीक्षक म्हणून कम केले. सुश्री मंजुषा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शाम उकिडवे यांनी आभारप्रदर्शन केले. 0000

ई – वेस्ट संकलन मोहीम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाने यशस्वी

 थ्री आर सेंटर्समधील कपडे संकलन मोहीम तसेच नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत ‘थ्री आर’ संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्याकडेही विशेष लक्ष देत आज ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत नमुंमपा…

 यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठींबा काढला

 मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज ठाणे: ‘धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही’, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या  यशवंत सेनेचे…

मित्रांचाही मित्र अजातशत्रू  बाळू कुडाळकर – डॉ साळगावकर

ठाणे : ‘बाळूचे व्यावहारिक नाव संतोष होते याचा आज अनेक मित्रांना शोध लागला. कुडाळकर कुटुंबीय चेंदणी कोळीवाड्याशी एकरूप झाले. क्रिकेटआणि समाजसेवा म्हणजे बाळूच्या जिवनाची दोन अविभाज्य अंगे होती.मित्रासाठी तन, मन…

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : नरेश म्हस्के

ठाणे :   प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा  गुण  अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका…

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा   ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट,  तिरुपती काकडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदररोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका व इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची काम करेल, या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे. तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करुन त्या तातडीने सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे, यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने संबंधित प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केले. घोडबंदर रोड अस्त‍ित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून लाईटस् बसविण्यात यावेत,  तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरूस्ती करणे, खड्डे तातडीने बुजविणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. 00000

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

कल्याण : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी…

शेजाऱ्याच्या भूमिकेकडे लक्ष

श्रीलंकेच्या दिवाळखोरीनंतरच्या झालेल्या पहिल्याच अध्यक्षीय निवडणुकीत अनुरा कुमारा दिसानायके विजयी झाले. या देशात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेले ते पहिले मार्क्सवादी नेते आहेत. श्रीलंका गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक संकटाशी…