राज ठाकरेंचं ‘मिशन विदर्भ’
विदर्भ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’ सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून ते येत्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील प्रमुख…
विदर्भ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’ सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून ते येत्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील प्रमुख…
मुंबईतील बॉम्बे रुग्णालयीत उपचार सुरू०प्रकृती स्थिर मुंबई- महाराष्ट्राचे अन्न, नागरि पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातून एअर लिफ्ट करून मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
पुणे : पुण्यातील मुसळधार पावासमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही…
चौकशी समितीच्या अहवालात ठपका राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत कामचुराकरपणा झाल्याचा ठपका या पुतळा कोसळल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशसमितीने ठेवलाय. २६ ऑगस्टला छत्रपतींचा हा पुतळा उभारणीनंतर अवघ्या ९ महिन्यात…
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…
मुलींमध्ये एमआयटी, आळंदीचा प्रथम क्रमांक पिंपरी, पुणे (दि. २६ सप्टेंबर २०२४) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ऍण्ड रिसर्च, डोंबिवली असोसिएशनचा संयुक्त कार्यक्रम डोंबिवली : जागतिक फार्मासिस्ट दिन डोंबिवली शहरात साजरा करण्यात आला. बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ फार्मसी सत्कार, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त अभिमन्यूजी काळे यांच्या हस्ते नीरज इंगळे, सुनंदा बिराजदार, तलाक्षी छेडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, मल्हार नार्वेकर सीईओ, जॉन डिसोझा प्राचार्य, शिक्षक वृंद डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी फार्मासिस्ट उपस्थित होते. कॉलेज कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन यावेळी अभिमन्यू काळे, निलेश वाणी, संजू भोळे, विलास शिरुडे, राजेश कोरपे अन्य पदाधिकारी कॉलेजचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने माजी आयुक्त अभिमन्यू काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राजेंद्र साळसकर मु़ंबई – श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील समाधी मंदिर विकास कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ६६.११कोटी निधी मंजुर झाला आहे. या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्या नुसार विकासकामाचे भूमिपूजन शुक्रवार ४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सुदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथे होणार आहे. सदर मिटिंगमध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे अध्यक्ष मधुकर नेराळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा मुंबईत घेण्यात आली होती. यावेळी दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत , सुभाष कसाबे, विजय निगडकर तसेच समाज इतर मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. या भूमीपूजन सोहोळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख दिलीप खोंड यांनी सर्व तेली समाज बांधवांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे आवाहन रमेश औताडे मुंबई : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित सर्व धर्मीय सद्भावना संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला विविध धर्मातील धर्म गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ज्या वेळी धर्माचा आधार घेऊन स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न होतात. सच्चा धर्माच्या विचारांना बाजूला सारून धर्माच्या नावाने पाखंडीपणा केला जातो तेव्हा खऱ्या धार्मिकांना त्या पाखंडाचं खंडन करून खऱ्या धर्माच रक्षण करावं लागतं. या संमेलनाला इस्लामचे उपासक मौलाना, जमात ए इस्लाम हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, हिंदू धर्मातील साधू, सन्याशी, बैरागी, वेदशास्त्र पंडित, निरंकारी, तुकडोजी महाराज परंपरेतील गुरूदेव संप्रदायाचे प्रबोधनकार, बौद्ध भिकू, भंत्ते उपस्थित होते.