Month: September 2024

रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबार – गोविंद बोडके

अशोक गायकवाड पालघर:पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नागरिकांना केले आहे. सोमवार ३० सप्टेंबरला दुपारी १२:३० वाजता अपर जिल्हाधिकारी यांचे दालन क्र. १०९, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे – क्रेडाई एमसीएचआय, आशर, रास रंग, ब्युटी ऑन बाईक, अर्चना मनेरा फाउंडेशन, आणि टॅग(मिस/मिसेस ठाणे) या संस्थांच्या विद्यमाने विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. `नारी तू नारायणी,…

एमजेएससी कॅरम स्पर्धेत रेहान शेख विजेता 

मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह…

क्षयरोग नियंत्रणाकरिता नमुंमपा आरोग्य विभागाची व्यापक जनजागृती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोग आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाने, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर शिबीरांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भेटी दिलेल्या…

 शिवसेना महाविजय संवाद महाराष्ट्र दौऱ्या’ला आजपासून प्रारंभ

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारने केलेली विकास कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना महाविजय संवाद दौऱ्या’चे आयोजन २८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी  दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सोशल मीडिया राज्यप्रमपुख राहुल कनाल, महिला आघाडी संघटना अध्यक्षा मीना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून सुरुवात होत आहे. दररोज सहा विधानसभांला भेट देणार आहोत. पहिला टप्पात मुंबईतील विधानसभांना भेट देणार आहोत.  यामध्ये बैठका,मेळावे आणि शाखाभेट आदींचा समावेश असणार आहे, सदर दौरा तीन टप्प्यात होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई, मुंबई उपनगरमधील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे तर १३ ऑक्टोबर ते  १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यांतर्गंत युवकांशी संवाद साधून युवा संघटन मजबूत करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती सर्व कामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या वतीने मीना कांबळी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दौरे करण्यात येतील. लाडकी बहीण संपर्क अभियान दरम्यान गाठीभेटी, मेळावे, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,अन्नपूर्णा योजना याचा आढावा घेण्यात येईल. सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया, वॉररुम आदींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. ०००००

जागतिक रेबीज दिनानिमित्त २८ सप्टेंबर रोजी अँटी रेबीज लसीकरण शिबीर-रोहन घुगे

ठाणे : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखान्यात २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमाभागातील नाक्यावर होणार तपासणी – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय आयोजित आंतर जिल्हा बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यानी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे यावेळी निश्चित करण्यात आले. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले.सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 0000

ठाण्यात नवरात्री पूर्वीच ‘हालो रे’ प्री नवरात्री 24 मध्ये गरबा रंगला

ठाणे : सगळ्याच दांडिया, गरबा प्रेमींनी आता नवरात्रोत्सव चे वेध लागले असतानाच ठाण्यात चार दिवसांपूर्वीच मोठ्या जल्लोषात गरबा रंगला. अवघा एनकेटी कॉलेजचा सभागृह दणाणून गेला होता. कारण होते ठाणेकर असलेला…

पनवेलच्या ऋषिकेश पेणकर यांनी सुवर्ण पदकासह पटकाविला मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब

पनवेल : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे…

प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीन विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा…