Month: September 2024

मुंबईत सुरू होणार पॅराडॉक्स संग्रहालय

मुंबई : भारतातील पहिले पॅराडॉक्स संग्रहालय लवकरच सुरू होणार आहे. कला, विज्ञानाबाबत मनोरंजनात्मक अनुभव या संग्रहालयात मिळणार आहे. २०२२ मध्ये मिलटोस कंबोरिड्स आणि साकिस तानिमानिडीस यांनी सुरू केलेले पॅराडॉक्स संग्रहालय…

मूर्तीशाळांमध्ये देवीच्या साजशृंगाराची लगबग

पेण-  : नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती बनवण्याची, त्‍यांचा साजशृंगार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. पेण हे गणपतीमूर्तींचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीही साकारण्याचे काम…

 डेब्रिजचे भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली

डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, माणकोली उड्डाण पूल भागात खाडी किनारी शहरातील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींचा मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. रात्रीच्या वेळेत हा मलबा गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला जात असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. रात्रीच्या वेळेत हे भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटीचे थोडेफार जंगल असलेला मोठागाव, कोपर, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव पट्टा डोंबिवलीत शिल्लक आहे. या भागातील खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून पर्यावरणप्रेमींचा एक गट या भागात सक्रिय आहे. त्यांनाही खाडी बुजून टाकण्यात आलेले भराव पाहून धक्का बसला आहे. एकीकडे वाळू तस्करांकडून वाळू उपशासाठी खारफुटीची बेसमुर कत्तल मुंब्रा ते डोंबिवली परिसरात करण्यात आली आहे. आता खाडीमध्ये भराव टाकून खाडी बुजविण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरूआहेत. मोठागाव भागात खाडीवर माणकोली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्याचे मोठागाव स्मशानभूमी ते रेतीबंदर रेल्वे फाटकापर्यंतचे काम सुरू आहे. रेल्वे मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. पालिकेचा टिटवाळा ते काटई वळण रस्ता या भागातून जाणारआहे. या भागातील जमिनींचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे या भागातील सरकारी, कांदळवन नियंत्रणाखालील सरकारी जागा हडप करण्यासाठी. या जागांवर बेकायदा गाळे, इमारती, चाळी बांधण्यासाठी भूमाफियांनी मोठागाव खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरू केले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. माणकोली पुलाच्या भागात खासगी, सरकारी अशा दोनच प्रकारच्या जमिनी आहेत. या भागात येत्या काळात पेट्रोलपंप, व्यापारी गाळे, वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा अधिक संख्येने चालतील या विचारातून माफियांनी मोठागाव खाडी किनारच्या जागा हडप करण्याचे षडयंत्र रचले आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात. योग्य नियोजन करून मोठागाव भागातील खाडीकिनारा, खारफुटी नष्ट करून बुजविण्याचे काम सुरू असल्याने पालिका, कांदळवन, महसूल अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करावी. हे कृत्य करणाऱ्या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या वर्षी मोठागाव जवळील देवीचापाडा येथील खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांविरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण दक्षता मंडळाच्या तक्रारीवरून चौकशीनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईवरून भूमाफिया दिवसा भराव टाकण्याऐवजी आता रात्रीच्या वेळेत खाडी किनारी भागात मलबा किंवा भराव टाकण्याची कामे करत आहेत, अशा तक्रारी आहेत. कोट मोठागाव खाडी किनारी खारफुटी नष्ट करून, खाडी किनारा बुजवून कोणी भराव टाकत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल. याप्रकरणी महसूल, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून संंबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील. अतुल पाटील उपायुक्त,घनकचरा विभाग. 0000

‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत स्वच्छता ही दैनंदिन…

 हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन

 मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या प्रतिनिधींनी मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनच्या मागील संपात मान्य केलेल्या मागण्यांबाबतचे जीआर ताबडतोब काढवेत, या मागणीला घेऊन बेमुदत उपोषण व हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. कृती समितीचे ज्येष्ठ नेते कॉ. अतुल दिघे यांनी उपोषणकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण करून कार्यक्रमाची सुरवात केली. कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृती समितीच्या शिष्ठमंडळांना मंत्रालयात बोलावून त्यांचे निवेदन स्विकारले. परंतु ही भेट उभ्या उभ्या झाल्यामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण आझाद मैदान जलमय झाले होते. मंडपात व स्टेजवर देखील प्रचंड ओल होती. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी खुर्च्यांवर बसून पूर्ण रात्र काढली. तरीही त्यांचे मनोबल तुटले नाही. पोलिसांनी त्यांच्या नियमाप्रमाणे संध्याकाळी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांनी तिथेच थांबण्याची ठाम भूमिका घेतली. कृती समितीचे नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले व शेवटी ही कारवाई थांबवण्यात आली. या शिष्ठमंडळात शुभा शमीम, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, नितीन पवार, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांचा समावेश होता. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे व अन्य अनेक अधिकारी उपस्थित होते. आझाद मैदानाच्या स्टेजच्या मागच्या गेटजवळील रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या आणण्यात आल्या व घोषणांच्या गजरात जेल भरो आंदोलनाला सुरवात झाली. कृती समितीचे प्रमुख नेते शुभा शमीम, भगवानराव देशमुख, सुर्यमणी गायकवाड, राजेश सिंग, नितीन पवार, माधुरी क्षिरसागर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. चार गाड्या भरून सत्याग्रहींना यलो गेट पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस यंत्रणा हजारो अंगणवाडी कर्मचारी महिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी अक्षम ठरल्यामुळे त्यांनी आझाद मैदानातच सर्वांना स्थानबद्ध करत असल्याची घोषणा केली व सुमारे दहा हजार महिलांच्या नावांची यादी करून त्यांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही ज्यांची नावे यादीत येऊ शकली नाहीत अशा सुमारे सहा हजार महिलांनी मैदानावर व मैदानाच्या बाहेर घोषणा दिल्या. परंतु पोलिसांची महिलांना अटक करण्याची क्षमता संपल्यामुळे त्यांनी याद्या करण्याचे काम बंद केले. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना सोडेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाण मांडून बसल्या. हे सर्व नेते परत आल्यानंतर सभा घेऊन सर्व सत्याग्रहींचे अभिनंदन करण्यात आले व लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला.पाऊस व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आंदोलनकर्त्या महिलांचा परतीचा प्रवास लक्षात घेता बेमुदत साखळी धरण्यामध्ये २६ व २७ या दोन दिवसांसाठी मुंबई व ठाणे येथील नागरी प्रकल्पातील कर्मचारी व ज्यांचा परतीच्या प्रवासाचे नियोजन उशीराचे आहे अशा बाहेरगावच्या कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसतील. ३० सप्टेंबरपासून मंत्रीमंडळाच्या बैठकीत मानधनवाढ, मासिक पेन्शन व ग्रॅट्युईटीचा निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून लोक २५० ते ३००च्या संख्येने रोज उपस्थित राहतील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे, असे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी सांगितले. ०००००

पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई –  उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

यांची तोंड आवरा !!

भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार अशी ज्यांची ख्याती व प्रचार केला जातो, त्या देवेन्द्र फडणवीस यांच्याच नागपूर जिल्ह्यातील कामटी विधानसभा मतदारसंघातील आमदराने असे काही तारे तोडले आहेत की भाजपाला…