Month: September 2024

बदलापूर एन्काऊंटरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांनी नालासोपाऱ्यातील महिला बलात्काराचीही जबाबदारी घ्यावी – वर्षा गायकवाड

मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’…

ठाणे  महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती’ ‘अंत्योदय दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

आपला दवाखाना बंद होण्याच्या मार्गावर ?

माथेरान : राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत याचा असंख्य गरजवंताला लाभ मिळत आहे. वैद्यकीय सुविधा सुध्दा ” आपला दवाखाना”या माध्यमातून सर्वाना मोफत तपासणी आणि उपचार केले…

पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई –  उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला…

इलेक्ट्रॉनिक वेस्ट साठी ‘जनरेशन ग्रीन’ अभियान

रमेश औताडे   मुंबई /जुने मोबाईल, चार्जर, हेडफोन, पावर बँक, टी व्हि, पंखे, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जुनी झाल्यावर कचऱ्यात फेकली जातात. मात्र हाच कचरा आता पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करत आहे. यासाठी  “जनरेशन ग्रीन” अभियान खारीचा वाटा उचलून ग्लोबल वॉर्मिग साठी हातभार लावेल असा विश्वास धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांनी व्यक्त केला. ए आय सी टी ई आणि ओपो इंडिया तसेच  सेंट झेवियर्स कॉलेज यांनी मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास व ओपो इंडिया प्रमुख राकेश भारद्वाज , सेंट झेवियर्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे उपस्थित होते. शाश्वत जगासाठी पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुणांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी ग्रीन स्कील व इंटर्नशिपच्या माध्यमातून पाच हजार विद्यार्थी “जनरेशन ग्रीन” च्या पहिल्या टप्प्यात  सहभागी झाले आहेत. याचा मला अभिमान आहे असे प्रमुख पाहुणे म्हणून, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य सचिव एसव्हीआर श्रीनिवास यावेळी म्हणाले. ००००

पनवेलच्या ऋषिकेश पेणकर यांनी सुवर्ण पदकासह पटकाविला मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब

पनवेल : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे…

 स्वच्छ केली नवी मुंबईतील 8 विभागातील धार्मिक प्रार्थनास्थळे

 1050 हून अधिक नागरिकांनी व स्वच्छताकर्मीनी नवी मुंबई : स्व्च्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत 17 सप्टेंबर पासून दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वर्दळीची ठिकाणे तसेच दुर्लक्षित स्थळांच्या सफाईकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे या मोहीमेचा प्रारंभही अनंत चतुर्दशीदिनी मोठया प्रमाणात होणा-या गणेश विसर्जन सोहळयानंतर लगेचच दुस-या दिवशी सकाळी सर्व विसर्जन स्थळांच्या सफाई मोहीमेने करण्यात आला. त्यानंतरही खाडी किना-यांवरील खारफुटी परिसर, रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट अशा विविध स्थळांवर सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात आला व नागरिकांनीही सर्वच मोहीमांना उत्साही प्रतिसाद दिला. अशाचप्रकारे आज आठही विभाग कार्यालयांमार्फत त्या त्या कार्यक्षेत्रातील धार्मिक प्रार्थनास्थळांची स्वच्छता मोहीम प्रार्थनास्थळांचे पदाधिकारी, तेथील स्वयंसेवक व कर्मचारी तसेच प्रार्थनास्थळाशी संबधित भाविक नागरिक आणि एनएसएसचे विद्यार्थी आणि महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र अशा 1050 हून अधिक नवी मुंबईकरांच्या एकत्रित सहयोगातून राबविण्यात आली. प्रार्थनास्थळांमध्ये अंतर्गत स्वच्छतेची काळजी घेतली जाते मात्र त्या सभोवतालच्या परिसर स्वच्छतेकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. ही बाब नजरेसमोर ठेवून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील प्रार्थनास्थळांवर राबविण्यात आली. सर्व ठिकाणी स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंधाची सामुहिक शपथ घेण्यात आली. यामध्ये – बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली सीबीडी किल्ले गावठाण येथील गोवर्धनी माता मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. नेरुळ विभाग कार्यक्षेत्रात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या माध्यमातून लोकसहभागातून इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिराची अंतर्गत व परिसर स्वच्छता करण्यात आली. वाशी विभागात से.9 येथील गुरुव्दारा व्यवस्थापनाच्या सहयोगातून सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली गुरुव्दारा परिसराची तसेच आतील भागाची सखोल स्वच्छता करण्यात आली. सफाईमध्ये जेटींग मशीनव्दारे प्रक्रीयाकृत पाणी फवारणीव्दारे स्वच्छता करण्यात आली. तुर्भे विभागामध्ये सानपाडा येथील पुरातन दत्त मंदिराची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये भाविक नागरिक मोठया संख्येने सहभागी होते. सहा.आयुक्त श्री. भरत धांडे आणि स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून या मोहीमेचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले. कोपरखैरणे विभागातही सहा.आयुक्त  सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी  राजुसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली पुरातन पावणेश्वर मंदिराची अंतर्गत व बाहय भागात सफाई करण्यात आली. घणसोली विभागात तळवली गाव येथील करजूआई गावदेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. सहा.आयुक्त  संजय तायडे व स्वच्छता अधिकारी  विजय पडघन यांच्या पुढाकाराने ही मोहीम स्थानिक लोकसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात आली. ऐरोली विभागामध्ये सहा.आयुक्त  शंकर खाडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली से-17 येथील श्री दत्त मंदिर याठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली. दिघा विभागामध्येही कन्हैय्यानगर येथील श्रीअष्टभुजा दुर्गामाता मंदिर परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी झाली. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्याठिकाणी भाविक नागरिक श्रध्देने जातात अशी विविध धर्मांची प्रार्थनास्थळे स्वच्छ असावीत या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्तम सहभाग लाभला.

‘उत्सव स्वच्छतेचा’ या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: आयुक्त सौरभ राव

ठाणे :  प्रतिवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ सर्वत्र साजरा केला जातो. या पंधरवड्यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा 2024’ ही देशपातळीवरील महापालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद                         

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार २७ ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार २८ ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील…

पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

थोर समाजसुधारक व विचारवंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त  शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी…