Month: September 2024

 सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थळाला दिली भेट

 प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश नवी मुंबई : सिडको अध्यक्ष,  संजय शिरसाट, यांनी २४ सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगी  विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संतालक,  शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,  गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको,  शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प व विशेष प्रकल्प) सिडको आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रावर, दोन टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळ हे प्रती वर्ष 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.5 टन मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे दोन समांतर टॅक्सी वे असणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी एनएमआयएएल यांच्यावर आहे. विकासपूर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्प स्थळी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लॅंडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या भेटीदरम्यान मा. अध्यक्ष यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सिडकोचे अधिकारी व सवलतधारक एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश दिले. कोट “सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.” संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको

नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज…

काळा घोडा परिसरात शनिवार-रविवारी वाहनांना बंदी

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची ५९वी वार्षिक सभा’ २८ सप्टेंबरला

मुंबई:- मुंबई शहर कबड्डी असो.ची २०२३-२४ची “५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा” शनिवार,२८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे मुंबई शहर संघटनेचे अध्यक्ष आमदार…

शिवनेरी मंडळाच्या कबड्डी स्पर्धेने मुंबईच्या कबड्डी मोसमाची सुरुवात ३ ऑक्टोबरपासून

मुंबई:- शिवनेरी सेवा मंडळाच्या विद्यमाने, मुंबई शहर कबड्डी  असोसिएशनच्या मान्यतेने ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष व्यावसायिक, व्यावसायिक “अ”, महिला तसेच कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…

ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा?-ॲड आशिष शेलार

मुंबई : अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय,हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार…

 जिल्ह्यात प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा, जलजीवन मिशन यशस्वी – डॉ. भरत बास्टेवाड

 ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन अशोक गायकवाड अलिबाग : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात आली असून ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत. तालुका : कुटुंबे : नळ कनेक्शन दीलेली कुटुंबे : टक्के, अलिबाग : ७१ हजार ३६४ : ५६ हजार १३२ : ७८.६७, कर्जत : ५४ हजार ५०९ : ४१ हजार ७९९ : ७६.६८, खालापूर : ३६ हजार ४७ : ३६ हजार ४७ : १००, महाड : ४२ हजार ४९९ : ३६ हजार ९४१ : ८६.९२, म्हसळा : १४ हजार ५६५ : १४ हजार ५६५ : १००, मुरुड : १६ हजार ४२३ : १५ हजार २६५ : ९२.९५, पनवेल : ८१ हजार ८३० : ७२ हजार ६०५ : ८८.७३, पेण : ४५ हजार ६७ : २९ हजार १९५ : ६४.७८, पोलादपूर : १६ हजार ५०३ : १३ हजार २९७ : ८०.५७,सुधागड : १५ हजार ८६५ : १२ हजार ४४५ : ७८.४४, तळा : ११ हजार ४९१ : १० हजार ३९६ : ९०.४७, उरण : ३६ हजार ३०० : ३६ हजार ३०० : १००, रोहा : ४२ हजार ६७० : ३७ हजार १९१ : ८७.१६, माणगाव : ४२ हजार १०४ : ३९ हजार ८१० : ९४.५५, श्रीवर्धन : २१ हजार ३८३ : १९ हजार ८३८ : ९२.७७ ०००००

पाणी पुरवठा विषयी जाहीर आवाहन

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10.00 ते रात्री…

 आशियातील सर्वात मोठया एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये

 4 हजारहून अधिक नागरिकांनी राबविले महास्वच्छता अभियान नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले. यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले. एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक लोकसहभागावर भर देत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थी सहभागावर भर दिला जात आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील  प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. या मोहीमेमध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यासह माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक व सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, एपीएमसीचे सहसचिव डॉ.महेश साळुंखे पाटील व संचालक अशोक वाळुंज व शंकरशेठ पिंगळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व विशाल डोळस, नमुंमपा घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व संतोष वारुळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. 00000