Month: September 2024

 छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, मीरा भाईंदरच्या इतिहासाचे शो !

म्युझिकल फाउंटनच्या ‘वॉटर स्क्रीन’वर दिसणार मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण, १६ कोटींच्या खर्चातून पूर्ण झाले तलाव सुशोभीकरण -प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी   भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील २ तलावांचे सुशोभीकरण करून त्यात ‘म्युझिकल फाउंटन’ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी या म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण होणार आहे. मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात हे संगीत कारंजे बसवले गेले असून यामुळे तलावासोबतच परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवघर येथील तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलाव या तलावात म्युझिकल फाउंटन ३० तारखेपासून सुरु होणार असून दररोज रात्री म्युझिकल फाउंटनचे येथे शो येथे होतील , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दोन्ही तलावातील या कामांवर सुमारे १६ कोटी खर्च करून हे भव्य – दिव्य आकर्षक काम पूर्ण केले गेले असून मीरा भाईंदर शहर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामात मोठी भर पडली आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर , गोडदेव , काशिमीरा तलाव हे जुने तलाव असून येथे परिसरातील नागरिक फिरण्यासाठी , निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ – संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून याकामासाठी १०० टक्के निधी राज्य सरकार कडून आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला होता. हा निधी राज्य सरकारने मीरा भाईंदर महापालिकेला दिला होता. त्यातून तिन्ही तलावात सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यातील दोन तलावातील कामे पूर्ण झाली आहेत. आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी सुशोभीकरणाच्या कामाच्या साईटवर जाऊन आढावा घेतला, कामाला गती दिली. गेल्या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की , नवघर येथील तलावाचे सुभोभिकारण करण्यात आले आहे आणि तलावात म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. नवघर तलावाच्या आत असलेल्या म्युझिकल फाउंटन म्हणजेच संगीत कारंजे उडतील त्यावर ‘वॉटर स्क्रीन’ बनेल. त्यावर ऑडिओ व्हिडीओ कन्टेन्ट म्हणजेच पाच – पाच मिनिटांचे शो दाखवले जातील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज , अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे मंदिर , मीरा भाईंदरचा इतिहास यावर हे म्युझिकल फाउंटन शो होणार आहेत व त्याची स्क्रिप्ट बनवली जात आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाउंटन सोबत ‘फायर नोझल’ लावला गेला आहे. फायर नोझल म्हणजे म्युझिकल फाउंटन सुरु असताना काही नोझल मधून फायर निघते …वॉटर आणि फायरचा संगम येथे पाहायला मिळेल. शिवाय नवघर तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाच्या परिसरात अम्पी थियेटर बनवले असून तेथे ५०० लोक बसून हा म्युझिकल फाउंटन शो बघू शकतील. लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे , तलावाला ग्रील लावले आहेत व लॅन्ड स्केपिंग गार्डन केले गेले आहे. नवीन कुंपण भिंत, नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे , बसायला वेगवेगळे कट्टे बनवले आहेत. नवघरच्या तलावात होणारा म्युझिकल फाउंटनचा शो हा लक्षवेधी , नयनरम्य आणि पाहण्यासारखा असेल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज रात्री ७ , ८ व ९ वाजता म्युझिकल फाउंटनचे शो होतील व संपूर्ण मीरा भाईंदर मधून लोक ते बघण्यासाठी येतील असेही ते म्हणाले. आकर्षक लाईट इफेक्ट्स विद्युत रोषणाई या म्युझिकल फाउंटच्या वेळी पाहायला मिळेल आणि लोक हे पाहताना आनंद व्यक्त करतील. काशिमीरा येथील जरीमरी तलाव येथेही म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. संगीतावर नाचणारे कारंजे येथे दिसतील. विशेष म्हणजे या संगीत कारंज्याची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषांप्रमाणे बदलू शकणार आहे अशी त्यात व्यवस्था केली गेली आहे.  स्वातंत्र्य दिन , दिवाळी , श्री गणेशोत्सव असे जे जे महत्वाचे दिवस असतील त्या दिवशी त्या म्युझिकल फाउंटनचे रंग बदलतील आणि त्या रंगातील व त्या म्युझिकवर म्युझिकल फाउंटन बघायला मिळतील. देशभक्ती , भक्ती संगीत किंवा प्रत्येक दिवसाप्रमाणे म्युझिकल फाउंटन सुरु राहणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.  मीरा भाईंदरच्या दोन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे या कामामुळे पालटले गेले असून परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे तलाव सुशोभीकरण करीत असताना तलावाचे पाणी कायम शुद्ध राहील याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरला भरभरून विकास निधी दिल्याने ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर शहर खूप विकसित आणि सुशोभित होत आहे. ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदरही सुशोभीकरणात पुढे चालले आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. ठाण्याच्या उपवन तलावात म्युझिकल फाउंटन लावला गेला आहे. त्याचप्रमाणे आता मीरा भाईंदरच्या दोन तलावात हे म्युझिक फाउंटन लावले गेले आहेत. नवघर तलावात तर म्युझिकल फाउंटनचे काम करताना फायर नोझल पहिल्यांदा लावला गेला आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडून निधी आणला. त्यांच्या संकल्पनेतून तलाव सुशोभीकरणासोबतच म्युझिकल फाउंटन लावले गेले. शिवाय आमदार सरनाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , जागेवर येऊन वेळोवेळी घेतलेला कामाचा आढावा व दिलेल्या सूचना यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले आणि संपूर्ण मीरा भाईंदरकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल , असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका…

 डॉ. अलका नाईक नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित

‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंचाचा २५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई, :  मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, साहित्यिक डॉ. अलका नाईक यांना नक्षत्र गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. नक्षत्राचं देणं काव्यमंच,…

खासदार रविंद्र वायकर यांनी केला अवयव दानाचा संकल्प

 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील महाआरोग्य शिबीरात 10 हजार पेक्षा जास्त नागरीकांनी घेतला लाभ मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेचे आरोग्य सुद्रुढ राहावे, यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शना खाली शिवे सेने तर्फे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत आयोजीत विनामुल्य महा आरोग्य शिबीरात वायकर यांनी अवयव दानाचा संकल्प करीत अर्ज भरला. या शिबीराचा सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. दिवसेंदिवस वाढत जाणारी व न परवडणारी उपचार पद्धती, आर्थिक बाबीनमुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यावर परिणामकारक उपाययोजना तसेच रोगाचे निदान वेळीच व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार वायकर दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. या शिबिरात विविध रोगांवर डॉक्टरांचे मार्गदर्शन, उपचार तर मिळातातच तसेच विनामुल्य औषधे देण्याचा प्रयत्न सातत्त्याने करण्यात येत आहे.    शिबिराचे उदघाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात लोकसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवाना आवश्यक्यतेनुसार व्हीलचेअर, नेक बेल्ट, वॉकर, गुडघापट्टी, आधार काठी, मोफत औषधे व चष्मे यांचे वाटप करण्यात आले.. शिबिरात अस्थी रोग, बाल रोग, स्त्री रोग, दंत रोग, नाक-कान-घसा, मधुमेह, रक्त तपासणी, डोळे तपासणी, हाडांची ठीसुळता, त्वचा रोग, सर्वसाधारण रोग आदींची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यात आयुर्वेदिक व होमीयोपथीक उपचार पद्धतीचा ही शिबिरात समावेश करण्यात आला होता.  या शिबीरात अवयव दानाचा स्टॉल उभारण्यात आला होता. खासदार रविंद्र वायकर यांनी हा फॉर्म भरून अवयव दानाचा  केलेला  संकल्प रोटो आणि सोटो च्या समनव्यक सुजाता अष्टेस्कर आणि पर्व संस्थेचे विश्वस्त प्रविण वराडकर यांच्या उपस्थितीत भरुन घेण्यात आला यावेळी बोलताना खा, वायकर म्हणले की बोलतो तेच प्रथम कृतीतून करून दाखवतो त्याच प्रमाणे आज अवयव दान संकल्प मी सुरू केला आहे आता संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि प्रसार करुन यासाठी अधिक जोमाने माझे कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास दिला. या शिबिरात मुंबई महानगर पालिकच्या के. ई. एम, नायर, ट्रॉमा, कूपर रुग्णालयातील डॉक्टर, त्याचं बरोबर डॉ. रत्नपारखी, डॉ. राहुल महाले, डॉ. प्रवीण बांगर आदी डॉक्टर सहभागी झाले होते. रोटरी क्लब, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.

निवडणूक अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा ठरला

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढाव घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  अधिकाऱ्यांचा मुंबई  दौरा निश्चित झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसांत दिल्लीतून अधिकारी महाराष्ट्रात येत असून राजकीय पक्षांसह निवडणूक…

अखेर ब्राह्मण समाजाच्या लढायला यश

अखेर ब्राह्मण समाजाच्या लढायला यश  भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर 50 कोटी रुपयांची महामंडळासाठी तरतूद मुंबई आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक…

सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूडजी यांच्या शुभहस्ते वांद्रे येथील प्रस्तावित नवीन उच्च न्यायालय संकुलाचे भूमिपूजन फलकांचे अनावरण आणि उदघाटन आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वर्षावर बंद दाराआड शिंदेंशी भेट

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड २० मिनिटे चाललेल्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाली, सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची…

बदलापूरचा वासनांध अक्षय शिंदेचा एनकाऊंटर

पोलिसांनी तीन गोळ्या ठोकल्या एनकाऊंटर बोगस असल्याचा विरोधकांचा आरोप ठाणे : बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुलिंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी एनकाऊंटर केला. पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर…