Month: September 2024

श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे मिळाले जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार

अशोक गायकवाड   पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

विसर्जन तलाव स्वच्छ करण्याची मागणी

मुलुंड ः पूर्वेतील मिठागर येथील तलावामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते; मात्र या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. या तलावाची दुर्दशा झाली असून या ठिकाणी…

 प्लॅस्टिक द्या, टी शर्ट, पेन घ्या!

 मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम : मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद   मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने शक्ती प्लॅस्टिक कंपनीच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्लॅस्टिक द्या, टी-शर्ट,…

 1600 हून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी केली खारफुटी परिसर स्वच्छता

 स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये…

 प्लास्टिक मुक्त माथेरान केव्हा होणार ?

 स्थानिकांसमोर यक्षप्रश्न !   माथेरान : माथेरान मध्ये बहुतेक ठिकाणी प्लास्टिकजन्य कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत दिसत असून स्वच्छ माथेरान, हरित माथेरान,सुंदर माथेरान ही बिरुदावली हळूहळू लोप पावत चाललेली असल्याने या…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

नवी दिल्ली, दि. 23 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर  दरम्यान मुंबई  दौ-यावर  येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची  विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल…

अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई : अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू…

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी-  अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी  परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री  म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. मेट्रोचे काम सुरु असताना वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री यांनी दिले.

नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज…

काळा घोडा परिसरात शनिवार-रविवारी वाहनांना बंदी

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि…