Month: September 2024

 धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ,

आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा   ठाणे : धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही, असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू, असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असतानाच, त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपाडे, दिपक पेंदाम, हंसराज खेवरा, ॲड शशिकांत नागभिडकर, सुनील झळके यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती धनगर आणि धनगड एकच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल, असा निर्णय महायुतीने घेतला आहे. परंतु धनगर ही जात असून ती जमात नाही. ते आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत. राज्याच्या अनुसुचित जमाती यादीत क्रमांक ३६ वर ओरॉन, धांगड आहेत. राज्यात ओरॉन, धांगड, धनगड या जमाती अस्तित्वात नाहीत. परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत. धनगर या जातीचा धांगड, धनगड या जमातीशी तिळमात्रही संबंध नाहीत, असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले. उत्तरप्रदेशातील अलाहाबाद न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण नाकारले आहे. असे असतानाही राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देत असेल तर ते घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असण्याबरोबरच घटनाबाह्य असेल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू. याशिवाय, राज्यातील विधानसभेच्या २५ जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेतच, असा इशारा देत आता राज्य सरकारने ठरवायचे आहे की अध्यादेश काढायचा की नाही, असे त्यांनी सांगितले.

राडोने दोन नवीन घड्याळे सादर केली

मुंबई : अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि…

कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्त्यावर, इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या वाहन चोरींमुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे…

 मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी

 जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार   मुंबई : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला तब्बल १३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने १३० कोटींची ही देणगी प्रतिज्ञाद्वारे दिली आहे. ‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या १० टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल १ लाख १.२ लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे आणि शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात आणखी सक्षम बनविण्यास सक्षण करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करते. दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर हे जागतिक उत्कृष्टतेच्या आणि एक नवे ध्येय गाठण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वापूर्ण निर्णय ठरेल. ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक शिक्षणात संस्थेचा दर्जा वाढवेल, असे नाही तर आर्थिक बाजारपेठेतील पुढच्या पिढीचे पालनपोषण करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून तिचे स्थान मजबूत करेल. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.” ०००००

नवीन पनवेलमध्ये गौरा गणपती सार्वजनिक उत्सवाचे आयोजन

पनवेल : नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुयोग्य व्यवस्थेत अनंत चतुर्दशीदिनी 8435 श्रीमूर्तींना भावपूर्ण निरोप

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी उत्सवाच्या दहाव्या दिवशी…

नागरिकांनी जागृतेश्वर तलाव परिसर स्वच्छ करीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केला शुभारंभ

नवी मुंबई : स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून स्वच्छतेमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत…

अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात ८५२३ श्रीगणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेट   ठाणे : अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ८५२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात सार्वजनिक मंडळाच्या ३२१ गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये ३९९४ तर, विशेष टाकी व्यवस्थेत ६२१ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. भाविकांनी १२३ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण १२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच, फिरत्या विसर्जन केंद्रात २० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ०७ टन निर्माल्‍य भक्‍तांनी केले दान दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १२ टन, सहाव्या दिवशी १३ टन निर्माल्य संकलन झाले होते. तर, अखेरच्या दिवशी ०७ टन निर्माल्य संकलित झाले. विर्सजनाची आकडेवारी (विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या) कृत्रिम तलाव (१५) – ३९९४ खाडी विसर्जन घाट (०९) – ३७६४ विशेष टाकी व्यवस्था (४९) – ६२१ फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २० मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – १२३…

 मृत्यूपूर्वी 7 व्या वेतनाची एकत्रित रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृतांचे आंदोलन

2 हजार रुपयांची भीक नकोचे पालिकेला दिले पत्र   उल्हासनगर – सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रसंगी मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय? अशी हाक शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला दिली होती. मात्र पालिकेने या हाकेला प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या सेवनिवृत्तांनी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आंदोलन पुकारले आहे. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील अनुदेय ठरणारी थकबाकी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचा शासन निर्णय असताना उल्हासनगर महानगर पालिकेने पाच वर्षानंतर फेब्रुवारी 2023 पासून दर महा दोन हजार रुपये याप्रमाणे ती प्रदान करणे सुरू केले आहे. सेवनिवृत्तांची फरकाची थकबाकी, निवृत्ती उपदान व निवृत्ती वेतन या सर्वांच्या फरकाची एकत्रित 5 ते 10 लाख रुपये होते.पण ती एकरकमी देण्याऐवजी 2 हजार रुपये प्रतिमाह देण्यात येत आहे. आता या तुटपुंज्या रकमेची आम्हाला भीक नको असे पत्रच सेवनिवृत्तांनी महानगरपालिकेला दिले आहे. हे सेवानिवृत्त कर्मचारी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आणि राज असरोंकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, नंदलाल समतानी, उमेश ठाकूर, अरुण जाधव, विलास सावळे, रतन दंडगव्हाळ, राकेश रॉय, सुंदर गजवानी, भगवान कुमावत, डी. एल. मगर, मनोहर पानसरे, भागवत पाटील, वामन सोनोने आदी बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करणार आहेत.

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसची पहिलीवहिली शाखा ठाण्यात

ठाणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपनी पैकी एक, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने (जेएमएफएस) तिची पहिली शाखा ए/४१०, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू केल्याची घोषणा केली.गतिशील आणि…