Month: September 2024

तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील – अनंत विष्णु

रमेश औताडे मुंबई : दारूबंदी करून मोफत आरोग्य व शिक्षण तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण केली  तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी  मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी . गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण. अजून  रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी  म्हणाले. सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था,  शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.

गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार!

बाप्पामुळे कष्‍टकऱ्यांची उपासमारीपासून सुटका मुंबई ः मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भक्तिभावाने करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव अद्याप जोरात सुरू आहे. बाप्पामुळे कित्येक हौशी कलावंत,…

मलवाहिन्यांवरील उघडी गटारे बंद करणार

पालिका ७३ लाख ९५ हजार रुपयांचा करणार खर्च मुंबई ः वाहनांची ये-जा सुरळीत होण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील मलवाहिन्यांवरील गटारे झाकणांनी बंद करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर…

राणी बाग बुधवारी सुरू राहणार

मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी (ता. १८) खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. १९) बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र…

ईद-ए-मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद-ए-मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण…

प्रीतमदादा म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली उलवेमध्ये नवरात्र उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन

‘नवसाला पावणारी उलवेची महाराणी’चा भक्तिपूर्वक पाद्यपूजन सोहळा संपन्न राज भंडारी पनवेल : नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने ६ वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे…

गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण

मुंबई : येत्या मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार असून त्याकरीता मुंबई महापालिका प्रशसानाची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई…

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची लवकरच यांत्रिकी पध्दतीने साफसफाई

चार यांत्रिक वाहनांची खरेदी कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी चार यांत्रिकी वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया निविदा पध्दतीने पूर्ण केली आहे. लवकरच ही…

कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कल्याण : मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबर घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन व्हावे यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शहरांमधील २३ विसर्जन मिरवणूक मार्गांवर १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियोजन…