क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन सेवांचा लाभ
भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक…
खारघरमध्ये कृत्रिम तलावाला पसंती
खारघर : खारघर वसाहतीत गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त कृत्रिम तलावाला अधिक पसंती देत आहेत. कृत्रिम तलावात दीड दिवसाचे दोन हजार ८४२; तर पाच दिवसांच्या एक हजार ५२२ गणेशमूर्तींचे विसर्जन…
ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी
पनवेल : लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू…
sमुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी
आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार, १३ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. शुक्रवार १३ सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे. परिक्षण व पारितोषिके विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात पारितोषिक तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन/ पुस्तक मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळावी व वाचनास प्रोत्साहित करावे या उद्देशाने यावर्षी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ प्रदर्शन / पुस्तक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यात त्या-त्या जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी ग्रंथालयांना तसेच विविध प्रकाशकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती आर.विमला यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’
मुंबई : व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण…
वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत
मुंबई : शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.…
गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा लाटला
शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त, दोघांवर गुन्हा अंबरनाथः राज्यातील गोरगरीब जनतेला सण उत्सवांच्या काळात मदत म्हणून अवघ्या शंभर रूपयात सहा जिन्नस असलेला एक अन्न धान्याचा संच दिला जातो. परंतु या संचातील शिधा काळाबाजारात विकण्यासाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. सामाजीक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिधावाटप दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काही सण उत्सवांच्या काळात अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्यांना सहा अन्न धान्य असलेला एक संच सवलतीच्या दरात म्हणजे शंभर रूपयांत दिला जातो. त्यामुळे सण उत्सवांच्या काळात गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होता. आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यात हा शिधा देता आला नव्हता. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या तोंडावर हा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ शहरातही अशाप्रकारे आनंदाचा शिधा आणि पंतप्रधान योजनेतील शिधा शिधावाटप दुकानांमध्ये देण्यासाठी आला होता. येथील पूर्वेतील महालक्ष्मी नगर येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४६ एफ १ या दुकानातील हा शिधा एका टेम्पोमधून बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी हा टेम्पो अडवून हा गैरप्रकार उघडकीस आणला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पो आणि त्यातील शिधा जप्त केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सुभाष भारती आणि कुदनकुमार गुप्ता या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चार लाख ३५ हजार रूपयांचे विविध अन्न धान्य जप्त केले आहे. अपहार करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या साठ्यात एक लाख १४ हजार रुपयांचा २ हजार ८७५ किलो तांदूळ, ५ हजार ५७० रुपये किमतीचे प्रधानमंत्री पिशवी ५५७ नग, अंत्योदय साखर १० किलो, साडी २ नग, ७०० रुपये, ७६,५०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा यात रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रत्येकी एक किलो, २७ हजार रूपये किमतीचा आनंदाचा शिधा प्रकारातील २७० नग तेल अशा जिन्नसाचा समावेश आहे.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी केली नमुंमपाच्या स्वच्छताविषयक कामाची प्रशंसा
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता कामांची तसेच स्वच्छतामित्र व सफाईमित्र यांच्यासाठी महानगरपालिका…
अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर
पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग मुंबई : विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्डे भरणे सोपे झाले आहे, शिवाय भरलेले खड्डे पुन्हा उखडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ऑगस्टमध्ये पालिकेने खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा मुसळधार पाऊस झाल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम यशस्वी ठरली नव्हती, तरीही खड्डे बुजविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरूच होते. दरवर्षी सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर ओसरल्यावर खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाते. यंदा मात्र, भर पावसातही खड्डे भरण्याची कामे सुरू होती. त्यामुळे भरलेल्या खड्ड्यांतील मिश्रण टिकत नव्हते. दुसरीकडे पाऊस सुरू असतानाही खड्डे भरावेत, कोणत्या विभागांत खड्डे पडले आहेत, याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी यंदा पालिका प्रशासनाने खास दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली होती. या अभियंत्यांवर खड्डे भरणे आणि शोधणे एवढीच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामात कुचराई करणाऱ्या २० पेक्षा जास्त अभियंत्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. विसर्जन मार्ग, मुख्य रस्त्यांवर डागडुजी गणेशोत्सावात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने अगोदरच रस्त्यांची डागडुजी हाती घेतली होती. आता गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन मार्गांसह मुख्य रस्त्यांवरील डागडुजी करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. 0000
