Month: September 2024

 कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २४५ ग्राहकांच्या घरात परतला ‘प्रकाश’

महावितरण अभय योजनेतून मिळवली वीजजोडणी; व्याजमाफीसह मूळ थकबाकीत सवलत कल्याण : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या कल्याण परिमंडलातील २४५ ग्राहकांची घरे प्रकाशाने पुन्हा उजळली आहेत. या ग्राहकांनी व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान ३० टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना-२०२४ चा लाभ घेत ही संधी साधली. १ सप्टेबरपासून या योजनेची सुरुवात झाली असून परिमंडलातील २ लाख ९४ हजार ९१ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना कायमस्वरुपी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी यातून मिळणार आहे. परिमंडलातील ३८९ ग्राहकांनी आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून उर्वरित ग्राहकांनीही योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे. अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. ३० टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे. कल्याण परिमंलातील २ लाख ९४ हजार ९१ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. योजनेत सहभाग घेत या ग्राहकांना विलंब आकाराचे ३ कोटी ८१ लाख व व्याजाचे ४० कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित झालेल्या संबंधित ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

फ्रँक्लिन पॉल या व्यक्तीने त्याच्या घरी राहता घरी सायन इथे गणपतीसाठी युनिक डेकोरेशन तयार केलेले आहे. ००००

जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ

सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली…

७० वर्षांवरील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व उत्पन्न गटातील ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम…

आता तरी ‘देवा’ मला पावशील का ?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आणि मनोभावे आरती केली.

मुंबईतील ऱस्ते आता टकाटक होणार

सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या परीक्षणासाठी आयआयटी मुंबईची नियुक्‍ती   मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईकरांची खड्यातून मुक्तता करण्यासाठी आणि मुंबईचे रस्ते टकाटक करण्यासाठी बृन्मुंबई महानगर पालिकेनेच स्वागतार्ह पावूल उचलले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा…

राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भुमिकेवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : काँग्रेसचे नेते  राहुल गांधीं  यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.  जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी…

गौराई माझी लाडाची लाडाची गं…

गणपतीच्या आगमनानंतर आलेल्या गौरीचे विधीवत पूजन करण्यात आलं. सात दिवसांच्या  गौरी गणपतीचे आज विसर्जन होणार आहे त्याआधी कोकणात प्रथेप्रमाणे रायगडच्या घोसाळे गावामध्ये गौरीची केलेली सजावट.

महाराष्ट्रात हे चाललय काय ?

 शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण… लहानमुलांनी टाहो फोडला तरी बेभानपणे मारहाण सुरु रायगड : महाराष्ट्रात नेमके चाललेय काय ? भाजपा प्रदेशाध्यक्षांची मुले दारूच्या नशेत कारने गाड्या उडवतात तरी त्यांच्यावर एफआयर नोंदविले…