Month: September 2024

नेपाळमध्ये महापुरात ६० जणांचा मृत्यू

नेपाळ : नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ३४ मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली…

गद्दारांना ५० खोके आणि बहिणींना फक्त १५००- ठाकरे 

नागपूर:  “गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014  ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?” असा ख़डा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव…

आनंद दिघेंची अडचण वाटणाऱ्यांनीच त्यांचा काटा काढला-संजय शिरसाट

 छत्रपती संभाजीनगर :  आनंद दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होतोय याची खुन्नस काहींना होती, त्यामूळे हे सर्व झाले. आनंद दिघे यांना मोठ्या…

बदलापूर एन्काऊंटरचे आव्हाडांकडून पोस्टमार्टेम

 प्रत्यक्षदर्शींची ऑडियो क्लिपच केली जाहिर मुंबई : बदलापुरमधिल वासनांध अक्षय शिंदेचे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटचे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनीच पोस्टमार्टेम केले आहे. आव्हाडांना आज या एन्काऊंटचा प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांचे संभाषणच समाजमाध्यमांवर…

उल्हासनगरच्या दफनभुमती अक्षय शिंंदेचा दफनविधी

 ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याचे पार्थिव दफन करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला होता. कोर्टात केस सुरु असल्यामुळे भविष्यात पार्थिवाची गरज लागल्यास हा निर्णय घेण्यात आला होता.…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वारगेट मेट्रोचे लोकार्पण

पुणे: बहुप्रतिक्षित स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत लोकापर्ण करण्यात आले. यावेळी कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन…

शिवतिर्थावर दसऱ्याला आवाज ठाकरे सेनेचाच !

मुंबई : वाजत या… गर्जत या… गुलाल उधळत या अशी मेघगर्जना करीत शिवतिर्थावरील दसरा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवतिर्थावरील दसऱ्याचा वारसा यंदाही उद्धव ठाकरेंची शिवसेनाच चालवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवतिर्थावर दसऱ्याला…

 अंगणवाडी कर्मचारी करणार १ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात चक्का जाम !

 मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शनच्या मागण्यांसाठी ठाणे : मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन या मागण्यांचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार असून १ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या नेत्यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले. २४ तारखेला मा महिला व बालविकास मंत्र्यांनी २६ तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच कॅबिनेटमध्ये मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यांच्या विनंतीवरून बेमुदत उपोषणाचे रुपांतर बेमुदत धरण्यामध्ये करण्यात आले. २५ सप्टेंबर रोजी सुमारे १६ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली. पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. २६ सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यामध्ये मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले व मागण्या कॅबिनेटमध्ये मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. इतके होऊनही शासनावर काही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे आज धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन ३० सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास १ ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे.

कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देणार-उदय सामंत

 रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर्ससह ५० हजार कोटींचे विविध प्रकल्प येणार ! अशोक गायकवाड   रायगड : राज्यशासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध ५० हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गार उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने उलवे, पनवेल येथे आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांतप्पा हरळय्या आदी उपस्थित होते. राज्यात अनेक गेमचेंजर प्रकल्प येत आहेत हे सांगताना आनंद होत असल्याचे सांगून उदयोग मंत्री सामंत म्हणाले उद्योगांना पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात उद्योग वाढावेत, यादृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान केल्या जात आहेत. राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने अतिशय सकारात्मक धोरण स्वीकारले. विदेशातील उद्योजकांना राज्यात निमंत्रित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला प्राधान्य दिले. याला अपेक्षित यश मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध ५० हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टला मंजुरी मिळाली आहे. यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असेही सामंत यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे ३५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.राज्याच्या उद्योग विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे यासाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून खा. सुनील तटकरे म्हणाले गडचिरोली सारख्या भागात देखील औद्योगिक विकास होतोय, रोजगार निर्मिती होतेय ही जमेची बाजू आहे. राज्यात गुंतवणूक, रोजगार निर्मिती झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तारते आहे. सिडकोमुळे नवी मुंबई आणि परिसराचा विकास होतो आहे. अटल सेतूमुळे मुंबईशी जवळीक वाढली आहे. राज्यात सर्वांकष औद्योगिक विकास होतोय. मध्यम आणि लघु उद्योगाच्या भूमिपुत्र उद्योजकांना देखील सवलती देण्याबाबत कार्यवाही करावे. राज्यातील वाढती गुंतवणूक ही राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे. या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. दक्षिण रायगड जिल्ह्यात देखील मोठया प्रमाणावर क्षमता आहेत. दिघी पोर्ट मुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ. महेश बालदी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, यांची भाषणे झाली. यावेळी उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध लाभांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत गुरुशांतप्पा हरळय्या यांनी केले. विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.