Month: September 2024

मीरा-भाईंदरच्या पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत !

 प्रताप सरनाईक यांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडे मागणी अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत अशी मागणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे. गेल्या १५ वर्षापासून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमदार असून माझ्या मतदारसंघातील अंदाजे ५० टक्के भाग हा मीरा-भाईंदर क्षेत्रात तर ५० टक्के भाग हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना महानगरपालिकेची घरे देण्यात आली असून १०० हून अधिक पत्रकारांनी घराचा ताबाही घेतलेला आहे. तश्याच पध्दतीची योजना मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही लागू करावी, अशी विनंती अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्याकडे, माझ्याकडे तसेच आयुक्त या नात्याने आपल्याकडेही केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काही इमारतींमध्ये शासकिय कोट्यानुसार महानगरपालिकेला घरे मिळणार असून त्यापैकी ५० टक्के घरे पत्रकारांना व ५० टक्के घरे ही विस्थापितांना देण्यासाठी मी आपणाकडे विनंती केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यानुसार आपण सदरची घरे ही पत्रकारांना देण्यासंदर्भात शासनाकडून अभिप्राय मागवून ही घरे ठाणे शहराच्या धर्तीवर पत्रकारांना वितरीत करावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांना केली आहे.

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छतेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे –  एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आुयक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर विविधि विभागांची बैठक आयोजित करावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना सूचना द्या. वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम करावेत, त्याचबरोबर त्याचे छायाचित्र पोर्टलवर अपलोड करावेत. समुद्र किनारी स्वच्छता बाबतही सर्वांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, सफाई मित्रांना लाभ द्यायचा आहे, त्याचबरोबर टाकाऊ पासून टिकाऊ यासाठी तसेच विविध स्पर्धांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहकारी गृह संस्था, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक या सर्वांना सहभागी करुन उपक्रम करावेत. सफाई कामगारांच्या कल्याणांसाठीच्या योजनाही राबवाव्यात. जिल्हाधिकारी सिंह यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री जनमन, विश्वकर्मा अशा योजनांचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. वयोश्री योजनेमध्ये १० हजार अर्जांना मंजुरी देवून जिल्हाधिकारी म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेत आधार सिडींगची प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करावी. वयोश्री योजनेतील मंजूर अर्ज अपलोड करावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तीर्थ दर्शन योजनेबाबत यादी तयार करुन पाठवावी. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यांनी अधिकाधिक उद्दिष्ट गाठून पूर्ण करावेत. पीएम जनमन योजनेत जनधन योजनेसाठी अग्रीण जिल्हा व्यवस्थापक यांना पत्र द्यावेत. किसान सन्मान योजना, मातृवंदना, शिधा पत्रिका वाटप अशा विविध योजनांचे लाभ वाढवावेत. तसेच विश्वकर्मा योजनेसाठी सरंपच स्तरावर प्रलंबित असणारी प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर फिशिंग नेट मेकर, क्वॉयर विव्हर, ब्रुम मेकर, बास्केट मेकर या क्षेत्रातील लाभार्थी यादी पाठवावी.

भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे

विशेष श्याम ठाणेदार थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज १२९ वि जयंती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी…

2 हजार दिव्यांग मानधनापासून वंचित – स्वप्नील पाटील

उल्हासनगर : 10-पहिल्यांदाच उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत 2200 कर्मचारी आणि 1800 सेवनिवृत्तांचा पगार हा 31 ऑगस्ट रोजीच करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.  असे असताना शहरातील 2199 दिव्यांगांना त्यांच्या मासिक मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी केला आहे. 2 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार स्विकारणारे विकास ढाकणे यांनी गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांना गावी जावे लागते, त्यांनी घेतलेल्या विविध वस्तूंचे आणि लोणचे हप्ते भरावे लागतात. या दूरदृष्टीचा विचार करून 1 सप्टेंबर रोजीच कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचा पगार करण्याचे निर्देश मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख यांना दिले होते. मात्र 1 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने किरण भिलारे,शरद देशमुख यांनी 31 ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या व सेवनिवृत्तांच्या खात्यात पगार जमा केला.आयुक्त विकास ढाकणे यांच्यामुळे पहिल्यांदाच दुसऱ्या महिन्याची तारीख येण्यापूर्वीच पगार झाल्याने सर्वच कमालीचे सुखावून गेले. दिव्यांगांना 2018 पासून एक हजार रुपये मानधन देण्यास सुरुवात झाली.2022 मध्ये दिड हजार रुपये मानधन करण्यात आले.अशातच तत्कालीन आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिव्यांगांच्या दिड हजार रुपये मानधनात सातशे रुपयांची वाढ करून मानधन 2200 रुपये केले.मात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना गणेशोत्सवात मानधन देण्याबाबत लेटलतीफपणा का करण्यात येत आहे?असा सवाल अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याशी विचारणा केली असता,दिव्यांग कल्याणकारी विभागाकडून बिल आले नसल्याचे सांगितले.दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधला असता,दर महिन्याला वेळेत दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा होते.पण दिव्यांग विभागातील लिपिकाची निवडणुकीच्या कामासाठी तहसील कार्यालयात बदली झाल्याने मानधनाचे बिल काढता आले नाही. लिपिकाला पालिकेत पाठवण्याची विनंती करण्यात आली असून ते येताच मानधनाचे बिल तात्काळ काढून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजेश घनघाव यांनी दिली.  

श्रीगणपतीची साडेतीन शक्तीपीठे श्रीक्षेत्र राजुरेश्वर गणपती दुसरे पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील एक संपूर्ण शक्तिपीठ (गणपतीचे शक्तिपीठ) आहे. जालना अधिकार भोकरदन हे तीर्थ क्षेत्र आहे. जालन्यापासून २५ किलोमीटर अंतरावर राजुर (राजूर गणपती) गाव आहे.राजुरेश्वर हे…

भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त ६८० पोलिस तैनात

 गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातही पोलिस सज्ज भिवंडी, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सवासंदर्भात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ८० पोलिस अधिकाऱ्यांसह ६०० पोलिस तैनात ठेवले आहेत. याशिवाय सर्व प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पुरुष व महिला पोलिसही तैनात आहेत. भिवंडीचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकरी यांनी अतिसंवेदनशील शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. १५ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शहरात १५ हजार ८२६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यात १५९ सार्वजनिक गणपती मूर्ती आणि १५ हजार ६६७ घरगुती विघ्नहर्ता मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले. पाच दिवस गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन नदीनाका, वरळदेवी तलाव, भादवड, कशेळी, काल्हेरसह ३२ ठिकाणी केले जाणार आहे. 0000

कंत्राटी डॉक्टरांवर क्षयरोग रुग्णालयाचा भार

 वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञांची कंत्राटी भरती मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता आपत्कालीन सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीचा शिरकाव होणार आहे. पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता तज्ज्ञ आठ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे, मात्र ही भरती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची जबाबदारी आता कंत्राटी डॉक्टरांच्या हाती असणार आहे. भविष्यात काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. नायर, सायर, केईएम, कूपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने धाव घेतात, मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला आहे. पालिका रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार देत लवकरात लवकर ठणठणीत करून घरी पाठवणे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे कर्तव्य आहे, मात्र पालिका रुग्णालयात आता कंत्राटी पद्धतीचा बोलबाला असणार आहे.

लाडक्या बहिणीवरून महाभारत!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जात असले, तरी हे राजकारण्यांना लागू होत नाही. त्यांना मतांसाठी अनेक ठेचा खाव्या लागतात. रिझर्व्ह बँकेचा सल्ला डावलून फुकटच्या योजनांचा निवडणूक जिंकण्यासाठी भडीमार केलेली राज्ये…

 गणेशोत्सव काळात राजकीय फलकबाजी

 न्यायालयाच्या आदेशांचा विसर मुंबई : सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. लक्षवेधी सजावट आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या आकर्षक रोषणाईने शहर उजाळून निघाले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नाक्यानाक्यावर, चौकाचौकात आणि गल्लीबोळात नेत्यांच्या शुभेच्छा फलकांनी शहराचे विद्रुपीकरण झालेले आहे. बेकायदेशीररित्या फलकबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करण्यावर उच्च न्यायालयाने वारंवार खडसावूनही शहर नेतेमंडळींच्या फलकांनी भरून गेले आहे. ठिकठिकाणी फलकबाजी करून नियमांचे व आदेशाचे उल्लंघन झालेले पाहायला मिळत आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय मंडळी साधत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप व प्रवेशद्वार, महत्वाचे चौक, नाका, कमानी आणि रस्त्याच्या दुतर्फा फलकबाजी करण्यात आली आहे. त्याला कोणताही पक्ष, गट-तट अपवाद नाही. राजकीय मंडळी, पदाधिकारी, आमदार व नगरसेवक होण्यास इच्छुक नेत्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे छोटे – मोठे फलक ठिकठिकाणी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय मंडळींसह विविध कंपन्या व उत्पादने आणि इतर विविध गोष्टींच्या जाहिरातबाजीचे फलक विविध ठिकाणी लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आर्थिक बाजू भक्कम असणे अत्यंत आवश्यक असते. वर्गणी, देणगी आणि राजकीय मंडळींकडून व विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून मंडळांकडे देणगी जमा होत असते. त्यामुळे शुभेच्छांचे फलक गल्ली-बोळात दिसतात. कंपन्यांपेक्षा नेत्यांच्या जाहिराती मोठ-मोठ्या कंपन्या सणांच्या काळात रस्त्यावर कमानी उभारून जाहिराती करतात. त्यासाठी मंडळांना देणगी देतात. यंदाही कंपन्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसत आहेत. मात्र, त्यापेक्षा यंदा नेत्यांच्या कमानींची संख्या अधिक दिसत आहे.

ऑक्टोबरमध्ये एसटीच्या डिझेल बस दाखल होणार

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बस नादुरूस्त असून, या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त बस अनेकदा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल…