Month: September 2024

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही – प्रफुल्ल पटेल 

 मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला दिला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे  सांगितले. २५ मतदारसंघ असे आहेत…

चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा ‘मिस्टर इंडिया !

सहा गाड्या उडवूनही एफआयआरमधून गायब मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह सहा वाहनांना धडक दिलीय. अपघातावेळी संकेत ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता…

महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व

नवी मुंबई : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन असून कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक आहे हे लक्षात घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन  चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलैला या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम उत्साहाने राबविला जात आहे. याकरिता इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या यांची निवड करून वाचन करीत आहेत व त्यावर विचार करून पुस्तकाचा सारांश लिहीत आहेत. हा सारांश महावाचन पोर्टलवर अपलोड केला जात आहे. या वाचन चळवळीचा एक भाग म्हणून ‘महावाचन उत्सव 2024’ अंतर्गत श्रीगणेशोत्सवाची सुट्टी लागण्यापूर्वी कोपरखैरणे गाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 36 येथे वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथालय प्रदर्शनामध्ये कोपरखैरणे परिसरातील 22 शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनाप्रसंगी 97 मुख्याध्यापक, 71 पालक, 136 शिक्षक, 5143 विद्यार्थी अशा एकूण 5447 उपस्थितांनी या प्रदर्शनाला भेट देत ग्रंथसंपदेचा अनुभव घेतला. या ग्रंथालय प्रदर्शनाचे शुभारंभ शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महानगरपालिका सचिव तथा कवयित्री श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, कवी मोहन काळे उपस्थित होते. यावेळी श्रीम. चित्रा बाविस्कर व श्री. मोहन काळे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर कविता ऐकवत वाचनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी कविता गायन केले. वाचन संस्कृती जपणुकीच्यसा दृष्टीने महत्वाच्या असणा-या या अभिनव उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा उत्स्फुर्तपणे सहभाग लाभला. काही पालकांनीही याप्रसंगी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्व सांगितले. या महावाचन उत्सव उपक्रमाच्या माध्यमातून लहानथोरांनी एकत्रित येऊन पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक

ठाणे : स्वतःचे कार्यालयाचे काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत, नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरूखकर आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे ४२ वे वर्षे आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला.

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी १७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

जालना:  मनोज जरांगे हे येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला…

साखळी उपोषणाच्या २८व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश!

ठाणे: ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. सुरभी रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केले आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते. गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्यावतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६/ २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने २८ दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे.

माकप नेते सीताराम येचुरींची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्यानं येचुरी यांना एम्समध्ये दाखल केलं. सीताराम येचुरी हे…

९७ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या

Untitled-4   पाणीपुरवठा विभागाची मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई ठाणे : मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर, खरीवली, देवी नाला, ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या ९७ नळ जोडण्या पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, पाणी बील वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रिडर यांची बैठक घेतली. या बैठकीत, मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने, मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये कल्याण फाटा येथून ६६० मीमी व ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे ५७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवर अवैधपणे नळ संयोजने घेतल्याचे निर्दशनास आले होते. त्यानुसार ही नळ संयोजने तोडण्याची कारवाई करण्यात आली. याचप्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळ संयोजने तोडण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले. 000000

आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून वादंग

स्वाती घोसाळकर मुंबई- मालवणमधिल शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून उठलेला वादंग शमतो न शमतो तोच आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सरसंघचालक…

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक गायकवाड नाशिक : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापिठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. पालकमंत्री भुसे यांनी नार – पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, खासदार भगरे, आमदार दराडे, आमदार इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार खोसकर, आमदार पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली.