Month: September 2024

विधानसभेच्या १२ जागा लढविण्यावर माकप ठाम – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर   ठाणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या १२ विधानसभा जागांची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून केली आहे. या १२ जागा लढविणार माकप ठाम असून याबाबत महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांचीच असेल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी डॉ.उदय नारकर यांनी दिला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती, आणि आपण लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना तेव्हाच लिखित स्वरूपात सादर केली होती. महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष मात्र माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा तीन मुख्य पक्षांमध्ये वाटून घेतल्या व त्यानंतर इतर पक्षांच्या बरोबर त्यांचा केवळ पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली. माकपने तेव्हाही महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचे हे असे करणे चुकीचे असल्याबद्दल आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. किमान विधानसभेच्या जागावाटपात तरी अशा प्रकारे आपसांत तीन पक्षांनी जागा वाटून घेऊन नंतर डावे पुरोगामी पक्ष व संघटनांबरोबर चर्चा सुरू करण्याची चूक होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल विनंती केली होती. मात्र लोकसभेच्या वेळेस जे झाले तेच विधानसभेच्या वेळेस घडताना आज दिसत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इतर डावे पुरोगामी पक्ष व विविध जनसंघटनांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक व महिलांच्या बाबतच्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी भाजप व त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात वर्षानुवर्ष तीव्र संघर्ष केला आहे. जनतेच्या या संघर्षांमधून पुढे आलेल्या मागण्या व डावे पक्ष विविध प्रश्नांबाबत घेत आलेली धोरणे यांचे प्रतिबिंब महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात उमटावे असा आग्रहही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या शिरस्त नेत्यांकडे लावून धरण्यात आला होता. मात्र याबाबतही कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्याप देण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूला हे प्रमुख तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून माकपने व इतर डाव्या पक्षांनी लढवण्यासाठी सादर केलेल्या जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी आणत आहेत. महाविकास आघाडीतील या तीन पक्षांची ही कृती समन्वयाच्या व एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा आणणारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना, पुरोगामी विचारवंत, पत्रकार, बुद्धिजीवी या सर्वांनी अपार मेहनत घेऊन राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण तयार केले होते. तेव्हा सर्वांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. परिणामी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र असे असले तरी महाविकास आघाडी व महायुती मधील मतांचे अंतर पाहता डाव्या शक्ती, विचारवंत, लेखक, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना यांना दूर ठेवून महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक जिंकता येईल असे आकलन करणे अतिआत्मविश्वासाचे ठरू शकते. देशाच्या जनतेत फूट पाडून जनविरोधी, धर्मांध, जातीय, भ्रष्ट व हुकूमशाही राजकारण करणाऱ्या भाजप व त्याच्या मित्रशक्ती संविधानाला व भारताच्या एकतेला धोका निर्माण करू पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व भारतीय जनतेच्या हितरक्षणासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींची एकजूट अत्यंत आवश्यक बनली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही एकजूट जास्त बळकट व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करतो की विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल, अशी भूमिका डॉ. उदय नारकर यांनी मांडली आहे. 00000

माथेरानच्या झोपडपट्टीला सुरक्षा कवचाची आवश्यकता

माथेरान : माथेरान मध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता साधारण पाच दशकापूर्वी इथे झोपडपट्टीची स्थापना झाली होती.त्यावेळी मिळेल त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांनी आपल्या झोपड्या उभारून कुटुंबासह राहू लागले होते.परंतु…

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प

नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस, राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प  रिपब्लिकन पक्षाचे ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र…

राज्यातील तरुणींना सरकारकडून स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार…

 ‘हर घर दुर्गा’ अभियानाची सुरवात मुंबई : आत्म संरक्षणासाठी राज्यातील तरुणींना स्व रक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात आयोजित केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘स्वरक्षण हा एक पर्याय नसून आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल,’ असे लोढा म्हणाले. ३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ‘हर घर दुर्गा ” अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबई , कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदाह शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे. राज्यातील १४ आय टी आय चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. मुंबई, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे.अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली. 0000

तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार –  हेमंत पाटील

रमेश औताडे   मुंबई : राज्यात बहु‌संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फाय‌द्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्‌याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे  पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे यांनी  ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल. असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. काही तथाकथित नेत्यानी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

 सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गाची सखोल स्वच्छता

   5500 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई : नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे…

रिलायन्स-स्टार इंडियादरम्यान ७१ हजार कोटींचा करार

रिलायन्स आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सुमारे 71 हजार कोटी रुपयांचा करार झाला. केंद्र सरकारच्या महिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कराराला मंजुरी दिली आहे. या करारांर्गत रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड…

 मुंबईच्या ज्येष्ठा पवारला तीन सुवर्णपदके

 इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा मुंबई: थायलंड येथे झालेल्या इन्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशन आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत लोअर परळच्या (मुंबई) सहा वर्षीय ज्येष्ठा शशांक पवारने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत…

श्रीलंकेत सत्तांतर ; भारताची डोकेदुखी वाढली

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत नुकतेच सत्तांतर झाले असून तिथे डाव्या विचासरणीचे अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. श्रीलंकेत नुकतीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत विमुक्त पेरामुना या राजकीय…

हैदराबाद मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर जनजागृती करण्यासाठी पिंक मॅरॉथनचे आयोजन

स्पर्धकांचा महाकाय पक्ष्याच्या आकाराच्या मानवी प्रतिमा तयार करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न हैदराबाद : भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, MEIL (Megha Engineering & Infrastructure…