Month: September 2024

 नंदिनी, अमृता, श्रेयश, तन्मय, गणेश, दिनेश ठरले सर्वोत्तम लिफ्टर

जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप स्पर्धा मुंबई : पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप या स्पर्धेत नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे, दिनेश पवारने अनुक्रमे आपापल्या गटात सर्वोत्तम लिप्टरचा मान मिळवला. रॉयल गार्डन, मुद्रे, कर्जत येथे सदर स्पर्धा पार पडली. सुधाकर परशुराम घारे (माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा  समिती रायगड जिल्हा परिषद,) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने ही स्पर्धा आयोजित केली होती.  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले. या स्पर्धेच्या क्लासिक सब ज्युनिअर मुलींच्या गटात नंदिनी उपर .(बॉडी लाईन जिम खोपोली), जूनियर मुलींच्या गटात अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब, खोपोली) ह्या “किताब विजेत्या झाल्या. सब ज्युनिअर क्लासिक मुलांच्या गटात श्रेयश जाधव (आयर्न मॅट जिम, खोपोली), जूनियर मुलांच्या गटात तन्मय पाटील (संसार जिम, पेण), सीनियर क्लासिक पुरुष गटात गणेश तोटे (फिट ऑन जिम, पनवेल) आणि मास्टर्स (४९,५०,६०, आणि ७० वर्षावरील स्पर्धक) स्पर्धेत दिनेश पवार (स्पार्टन जिम, लौजी खोपोली) हे किताब विजेते ठरले. सांघिक विजेतेपद जी व्ही आर जिम, कर्जत यांना मिळाले. उप विजेतेपद हनुमान व्यायाम शाळा, पेण यांनी पटकावले तर तृतीय क्रमांक बॉडी लाईन जिम, खोपोली यांना मिळाला. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि सचिव अरुण पाटकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेत मुंबईचे गोपीनाथ पवार, सुरेश धुळप,  जितेंद्र यादव, अंकुश सावंत, प्रशांत सरदेसाई, साहिल उतेकर, पुण्याचे विजय पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. 0000

 डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व दै.लोकमत संचलित ’गणेश दर्शन स्पर्धा २०२४’ चा

 शालेय विद्यार्थ्यांच्या गणेश मूर्ती वर्कशॉपने  श्री गणेशा… मुंबई : ४ सप्टेंबरला डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व दै.लोकमत संचलित गणेश दर्शन स्पर्धेचा श्री गणेशा संपन्न झाला. ठाण्याच्या कोरम मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांचे…

पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांना दिला वेग

रस्ते, वाहतूक, रुग्णालय, एसआरए प्रकल्प, पाणीपुरवठ्याचे प्रश्न लागले मार्गी राजेंद्र साळसकर मुंबई : उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी बोरिवली येथे व्यापक आढावा बैठक घेतली. दोन तासांच्या मॅरेथॉन सत्रात बीएमसी, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासह विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोयल यांनी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि निर्धारित मुदतीत ते पुर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि एसआरए, म्हाडाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली. मुदत देताना काळजी घ्या खासदार पियूष गोयल यांनी अधिकाऱ्यांना मुदत निश्चित करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. प्रकल्पातील गुंतागुंत मलाही समजते. कृपया मला फसवू नका. येत्या सणासुदीच्या काळात जनतेला त्रास देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भगवती रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ऑक्टोबरच्या अखेरीस रुग्णालयाचा पहिला सहा मजला सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. पुनरावलोकन केलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे- भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास: परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. कोस्टल रोड भाईंदरपर्यंत अपूर्ण एसआरए प्रकल्प: देवीपाडा आणि इतर भागात जेथे काम रखडले आहे अशा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मढ-वर्सोवा पूल बांधकाम: कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प. चारकोपमधील एफएसआय शुल्क: चारकोपच्या सेक्टर ८ आणि ९ मधील एफएसआय शुल्कांवर चर्चा आणि निर्णय. नवीन पाणी पाइपलाइन: उत्तर मुंबईत पुरेसा पाणीपुरवठा होईल याची दक्षता घेणे. आकुर्ली ब्रिज अपडेट: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुलाच्या बांधकामाची प्रगती. कोस्टल रोडचा भाईंदरपर्यंत विस्तार: मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या विस्तारामुळे रस्ते संपर्कात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अतिरिक्त विषयांमध्ये दहिसर चेकनाका पार्किंग झोन, कौशल्य विकास केंद्र आणि ३७ एकर जागेवर सुविधा निर्माण करण्यात येतील. दहिसर टोलनाका स्थलांतरित करणे, तलावांचे गाळ उपसणे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि एक पेड माँ के नाम अभियान या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली. उत्तर मुंबईसाठी गोयल यांची बांधिलकी बैठकीच्या निकालावर समाधान व्यक्त करताना पियूष गोयल म्हणाले, उत्तर मुंबईचे उत्तम मुंबईत रूपांतर करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. आम्ही ‘संपूर्ण सरकार’ विकासाच्या जवळ जात आहोत. शिक्षण, क्रीडा, गृहनिर्माण किंवा वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये योगदान दिल्याचा मला सन्मान वाटतो. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका घेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, त्यामुळे समन्वय आणि सर्वांगीण नियोजन, जलद निर्णय घेणे आणि संसाधनांचे पूर्ण ऑप्टिमायझेशन एका व्यासपीठावर सुधारते ज्यामुळे अडथळे दूर करण्याचा मार्ग मोकळा होतो. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सर्व आमदार यांनी वर्षानुवर्ष केलेले प्रयत्न आणि सखोल अभ्यास यावर मी सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून सर्व मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या नंतर आपापल्या मतदारसंघाचे सर्व महत्वपूर्ण  निर्णयाबद्दल उपस्थित आमदार आपण सर्वांना माहिती देतील. केंद्रीय मंत्री खा.पियूष गोयल आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.…

घरगुती गणेशोत्सवावर अयोध्येतील राममंदिराचा प्रभाव

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घराघरांतील तयारीही अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत सर्वांमध्ये उत्साही वातावरण होते. त्यामुळे श्री रामाच्या रूपातील गणेशमूर्ती…

माथेरानच्या गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार

माथेरान : दोनच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने माथेरान मध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आपल्या लाडक्या बाप्पाला दस्तुरी टॅक्सी स्टँड पासून गावात आणण्यासाठी गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण…

तळा येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने कार्यान्वित करावे-आदिती तटकरे

अशोक गायकवाड   रायगड : रायगड जिल्हयातील तळा तालुक्याच्या मुख्यालयी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापनेस राज्यशासनाने मान्यता दिलेली आहे.त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही आणि देखभाल दुरुस्ती करून हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता महाड महेश नामदे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून मुख्य इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. आंतररुग्ण विभागास नव्याने प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे तातडीने बांधकाम आदेश देण्याचे निर्देश कु. तटकरे यांनी यावेळी बांधकाम विभागास दिले. या रुग्णालयात बाह्यरुग्ण व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरीचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी तसेच एक्सरे मशीन व इतर रुग्ण संबधी अत्यावश्यक साहित्य, साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले होते. त्यानुसार सर्व साधन सामग्री आणि मनुष्यबळ या रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी यावेळी सांगितले. या रुग्णालयात आय सी यु बेड्स आणि आवश्यक तो औषधंसाठा आणि रुग्ण वाहिका सुविधा प्राधान्याने उपलब्ध राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या. तळा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रस्ते आणि पथदिवे बसविण्याची कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने करावी तसेच रुग्णालयासाठी सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या. तळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काही प्रमाणांत पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये रुग्णसेवेसाठी एक आठवड्यामध्ये बाहयरुग्ण विभाग व ईमरजन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यांत यावी असेही कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५…

 चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव!

 कोळीवाडावासियांच्या आत्मियतेच्या बंदराला भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्या मागणीला यश   ठाणे : अनेक दशकांपासून चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजबांधवांबरोबरच अन्य समाजातील नागरिकांच्याही आत्मियतेचे बंदर असलेल्या चेंदणी कोळीवाडा मिठबंदर रोड बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव देण्यात आले आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आयोजित कार्यक्रमात नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ठाणे शहराच्या स्थापनेपासून चेंदणी कोळीवाड्याला इतिहास आहे. कोळी समाजबांधवांचे वास्तव्य असलेल्या चेंदणी परिसराने अन्य मराठीजनांनाही सामावून घेतले. चेंदणी कोळीवाड्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी मिठाचे उत्पादन होत होते. त्यामुळे खाडीवरील बंदराला मिठबंदर रोड असे नाव पडले होते. कालांतराने मिठाचे उत्पादन बंद होऊन, गणेशोत्सवात दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे खाडी किनाऱ्यावर विसर्जन केले जात होते. त्यामुळे या बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे या ठिकाणी चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर अशा नावाचा फलक बसविण्यात आला. याबद्दल चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष विक्रांत कोळी, सुभाष कोळी, कमलाकर कोळी, प्रकाश ठाणेकर, जीत बारांगुळ, हेमंत ठाणेकर, कृष्णकुमार कोळी, गिरीश कोळी, प्रशांत नाखवा, कुणाल भोईर, जमीर कोळी यांच्यासह चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदे मार्फत देण्यात येणारा “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५” सोहळा गुरुवारी बी. जे हायस्कूल येथे पार पडला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षांतील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत.‌ शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, एफ. एल. एन, वोपा टूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्याज्ञान इ. दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षक दिनाच्या सदिच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा ५ सप्टेंबर रोजी पार पाडतोय ही आनंदाची बाब आहे. आई-वडील, शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचे काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा, असे मार्गदर्शन उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे तीन वर्षांतील १५ शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला.‌ जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात, शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव मिळण्यास मदत होते. शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्‍नशील असलेल्‍या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा, असे आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असे मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाराम ढमके, राजश्री पाटील यांनी केले. सन २०२२-२३ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील सहा. शिक्षिका अनघा आनंद सोनकांबळे, भिवंडी तालुक्यातील मुख्याध्यापिका पुष्पलता काशिनाथ गायकवाड, कल्याण तालुक्यातील पदवीधर शिक्षक आत्माराम बाळाराम पागडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अरुण विनायक गोडांबे, शहापूर तालुक्यातील सहा. शिक्षक डॉ. हरिश्चंद्र तुकाराम भोईर. सन २०२३-२४ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुचित्रा राजेंद्र सोनार, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विलास अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्रद्धा सुनिल पवार, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अशोक महादू रोठे, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुधीर पुंडलिक भोईरसन २०२४-२५ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुका तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणपत शंकर धुरी, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अर्चना अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चतूर महारू वाघ, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक डॉ. प्रशांत तुकाराम माळी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शेखर शिवराम घोडविंदे. ०००००

 सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

 ७ सप्टेंबरपासून तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० असणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ कि.मी. आणि २ ते ४ कि.मी. करिता रु. १०, पुढील ४ ते ६ कि.मी. आणि ६ ते ८ कि.मी. करिता रु. २० आणि ८ ते १० कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रु. ३०, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. ४० इतका होता. हा तिकीट दर आता रु. ३० असणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे. कोट “जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ घ्यावा.” श्री. विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको