Month: September 2024

 ठाकरे गट, ‘अभाविप’विरोधात अपक्षांची एकजूट

 मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मुंबई : मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी मतांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप यांना टक्कर देण्यासाठी छात्रभारती, बहुजन विकास आघाडी (वसई) आणि इतर अपक्षांनी वेगळे एक ‘पॅनल’ करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण २८ उमेदवारांपैकी प्रत्येकी १० उमेदवार हे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप या संघटनांचे आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे १, मनसेचे १ राज्य सचिव आणि २ जणांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांना टक्कर देण्यासाठी छात्र भारती, बहुजन विकास आघाडी आणि उर्वरित अपक्षांनी कंबर कसलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन संघटना नेमका कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘अधिसभा निवडणुकीत पसंतीक्रमाला महत्त्व असते. त्यामुळे सर्व अपक्षांना एकत्र करून एक नवीन ‘पॅनल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी सनील मोसेकर म्हणाले, ‘छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांची युती जवळपास निश्चित असून अपक्षांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करू.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘अधिसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे आणि सर्व पर्याय खुले आहेत’. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा प्रचार प्रारंभ; वचननामा प्रसिद्ध ठाकरे गटाच्या युवा सेनेने अधिसभा निवडणुकीत २०१० साली १० पैकी ८ आणि २०१८ साली सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युवा सेनेने अधिसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचे प्रकाशन करून प्रचाराला सुरुवात केली.

घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर…

घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर…

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २०…

कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण

डोंबिवली : कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळी गणपती आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढत असल्याने या संथगती मिरवणुकांमुळे काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरे सकाळ,…

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी…

गणेशोत्सवात काळात अवजड वाहने बंद करण्याची एआयएमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा नको म्हणून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात येत होती. मात्र यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही अवजड वाहतूक…

 बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदल!

माथेरानच्या थंडाव्याची प्रतिमा पुसली जाण्याची स्थानिकांना भीती   माथेरान : काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली झाडे मुळासहित उन्मळून पडत आहेत त्यामुळे इथल्या वातावरणात बदल झाला असून पावसाळ्यात सुध्दा याठिकाणी पंखा लावल्याशिवाय चैन पडत नसून पर्यटक सुध्दा हॉटेल तसेच घरगुती लॉज मध्ये नेहमीच एसीची मागणी करताना दिसत आहेत. दोन दशकांपासून येथील व्यवसायात मंदीचे सावट दिसत असल्यामुळे काही हॉटेल धारकांनी तसेच बंगले मालकांनी आपले जुने बंगले विकले आहेत. याच जुन्या बंगल्याच्या जागी अलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी अनेकदा येथील राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सर्रासपणे वृक्षतोड करण्यात आलेली असून वनखात्याच्या जागा सुध्दा बळकावण्यात आल्या आहेत. तर परिसरातून पोट भरण्यासाठी आलेल्या मंडळीनी आता इथेच आपले कायमचे बस्तान मांडल्यामुळे त्यानी सुध्दा जागा मिळेल त्याठिकाणी भरमसाठ वृक्षतोड करून एकमजली घरे उभारली आहेत. नव्याने सुध्दा हॉटेल बांधण्यात येत असून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल केली जात आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी अडसर ठरणारी मोठमोठी जुनी झाडे कुऱ्हाडीचा आवाज होऊ नये यासाठी करवतीच्या साहाय्याने मुळासहित कापत आहेत.दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या ठिकाणी असंख्य झाडे कशामुळे सुकून गेली आहेत यावर वनखात्याने, वन समितीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. या सर्व बाबींवर संबंधित अधिकारी वर्ग तसेच नेमून दिलेल्या समितीच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. नुकताच मेघदूत हॉटेलमध्ये सुध्दा अशाचप्रकारे झाड पाडण्यात आले आहे याबाबत येथील वनखात्याच्या अधिकारी वर्गास विचारणा केली असता आम्ही वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे तर वन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सुध्दा अशाचप्रकारे उत्तर देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. माथेरान परिसरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात ३८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आले आहे याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली असून वृक्षतोड वर काहीतरी उपाययोजना करावी यासाठी पर्यावरण प्रेमी नागरिक राकेश कोकळे यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली होती. सदर झाड सुकलेले असून ते तोडल्या प्रकरणी वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार वृक्षतोड करणाऱ्या मालकावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. उमेश जंगम–वन क्षेत्रपाल

 ‘श्रावणरंगात रंगली तरुणाई’

 कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयात श्रावणरंग महोत्सव साजरा   कल्याण : श्रावण महिना म्हणजे निसर्गाची समृद्धी, सांस्कृतिक सण-उत्सव यांचा आनंद अनुभवण्याचा काळ. आजच्या तरुणाईला आजच्या आकर्षणामधून बाहेर काढून या आनंदाकडे वळवणे ही किमया या श्रावणरंग महोत्सवात साधली गेली. के. एम. अग्रवाल महाविद्यालयात `अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’, (IQAC) मार्फत, श्रावण महिन्यात `श्रावण रंग महोत्सव’  साजरा केला गेला. ८ ऑगस्टला श्रावणातील `रानभाज्या महोत्सव’, साजरा झाला. जवळ-जवळ २५ आदिवासी महिलांच्या उपक्रमशीलतेला चालना देत रान भाज्यांची विक्रीचे स्टॉल तसेच तयार ‘रानभाजी-भाकरी’चे स्टॉल महाविद्यालयात लावण्यात आले. याचबरोबर या भाज्यांचे औषधी महत्त्व तसेच आहारातील त्यांचे घटक पूर्ण महत्त्व स्पष्ट करणारे पोस्टर प्रदर्शन सुध्दा आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्वाती देशपांडे, उपायुक्त केडीएमसी, सुप्रिया देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कल्याण, तसेच प्रशांत गवाणकर, समाज विकास अधिकारी, केडीएमसी लाभले होते. १२ ऑगस्टला, ‘एक हजार सूर्य नमस्कार’ या संकल्पाचे आयोजन केले होते. प्राध्यापिका सौ. कुलकर्णी, मेनन महाविद्यालय, मुंबई, यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. १३ ऑगस्टला `श्रावण रूची महोत्सव’, आयोजित केला होता. श्रावणातील उपवासाचे पदार्थ असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. उपवासाचे पदार्थांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरीव सहभाग नोंदविला. १६ ऑगस्टला, `ऐतिहासिक मंदिर भेट’, कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला जवळ जवळ ९५ विद्यार्थ्यांनी भेट दिली. २० ऑगस्टला, ग्रीन डे अंतर्गत परीसरातील महाविद्यालयात `फळ व फुलांच्या बीजांचे वितरण’, हे कार्यक्रमाचे स्वरूप होते. २१ ऑगस्टला, `औषधी वनस्पतींचे प्रदर्शन’, तसेच `औषधी वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व’, यावर व्याख्यान आयोजित केले होते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमीता कुकडे, उपाध्यक्ष, निमा महिला फोरम, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या बाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता कला विभागाच्या सहभागाने आयोजित  ३० ऑगस्टच्या `श्रावणसरी’, या कलाविष्काराने झाली. या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गायन, नृत्य सारख्या कला आविष्कारांना चालना देणारा कार्यक्रम आयोजित केला गेला. `श्रावण रंग महोत्सव-२०२४-२५’, चा उद्देश हा विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन, पर्यावरण संवर्धनआणि सामाजिक जागृती, समाजभान जाणीव हा होता.

ठाकरे गटाचा मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुखरुपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख,हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. महिला व मुलींबाबतच्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,फॉरेस्ट, विद्युत कंपनी, औद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालया संदर्भातील विविध जनहितार्थ मुरबाडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेनेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश म्हात्रे यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली.