महापालिका लोकशाही दिनाचे ०७ ऑक्टोबरला आयोजन
२३ सप्टेंबरपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : महापालिकेचा पुढील लोकशाही दिन ०७ ऑक्टोबरला होणार आहे. तरी नागरिकांनी ऑक्टोबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच दिनांक २३…
२३ सप्टेंबरपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : महापालिकेचा पुढील लोकशाही दिन ०७ ऑक्टोबरला होणार आहे. तरी नागरिकांनी ऑक्टोबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच दिनांक २३…
प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरु आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनेवल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील रहायला पाहिजे असे प्रतिपादन करून केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती नागरीकांपर्यत्त पोहचवा असे आवहन कार्यकर्त्यांना केले. पनवेल विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने काम करून नागरीकांना विकासकामांच्या माध्यामतून विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या १ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प निधीतून चिंध्रण देवीचापाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह सुधारणा करण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी १० लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून चिंध्रण अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, १५ लाख रुपयांच्या निधीतून चिंधण मधील अंतर्गत गटार बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि १० लाख रुपयांच्या स्थानिक जिल्हा परिषद सेस निधीतून चिंधणमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामांचेही भुमीपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवाजीराव दुर्गे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कमला देशेकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, खैरणेचे सरपंच शैलेश माळी, सरपंच एकनाथ पाटील, शिरवलीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, नितीन काठावले, भाजप नेते अशोक साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील, भाजप नेते प्रदीप माळी, रविंद्र पाटील, बाळू काठे, युवा नेते विजय म्हात्रे, भगवान खानावकर, पालेबुद्रुकचे माजी उपसरपंच दीपक उलवेकर, भाजप नेते प्रकाश खैरे, हरिश्चंद्र पाटील, समाजसेवक भगवान कडू, युवानेते अंकुश पाटील, माजी सरपंच भगवान पाडेकर, युवानेते कैलास मढवी, जेष्ठ नेते लक्ष्मणबुवा कडू, भाजप ओबीसी सेलचे माजी उपसरपंच गणपत कडू, ग्रामपंचायत सदस्या दिपाली सोनावळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर, मनोज कुंभार, सुरेश पाटील, माजी उपसरपंच नरेश सोनावळे, अनंता कडू, हिरामण पाटील, सदस्य आत्माराम पाटील, माजी सदस्य प्रकाश पाटील, पोलीस पाटील रामदास पाटील,युवा नेते रोहिदास पाटील, समाजसेवक धनाजी कडू, भाजप नेते एकनाथ मुंबईकर, राम देशेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार…
अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटीस प्रकल्पात बाधित कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर २६ कुटुंबांना बीएसयुपी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबीयांना पत्रे दिली. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. २० दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. कोपरी येथील सॅटीस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्षे पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी श्री.केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश दिलेच शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होती. या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या. या लाभार्थ्यांना बीएसयुपी योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली. आज शासकीय विश्रामगृहात य लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आली. अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले† याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन वेळीच झाले नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत. अशा अनेक बाधित कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे श्री. केळकर म्हणाले. यावेळी सी पी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली. रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा, जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले. नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे. लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल, अशी माहितीही श्री.केळकर यांनी दिली. लोढा आमारा येथील घन कचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटी नियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिक, विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. महापालिकेने ठेकेदारास नोटीस बजावली आहे. तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजपा कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिला. 0000
जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह इच्छुकांनी गाठले प्रदेश कार्यालय अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीच्या जागावाटपावर खलबते सुरू आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच ठाणे शहरातील चारपैकी तीन जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कळवा – मुंब्रा मतदारसंघात डॉ. जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्याचवेळेस ठाणे आणि ओवळा – माजिवडा मतदारसंघांवरही ठाणे राष्ट्रवादीने दावा केला आहे. बुधवारी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह सर्व इच्छुकांनी प्रदेश कार्यालय गाठून निवडणूक लढविण्यासाठी आपले अर्ज सादर केले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघावर दावा केला आहे. सन २०१९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी पक्षाच्या विनंतीवरून अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरूद्ध मनसे अशी लढत झाली होती. त्यामध्ये संजय केळकर हे विजयी झाले होते. त्यावेळेस मनसेच्या अविनाश जाधव यांच्या मतांमध्ये एकसंघ राष्ट्रवादीच्या मतांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच आता राष्ट्रवादीने या मतदारसंघावर पुन्हा दावा केला आहे. तर ओवळा – माजिवडा मतदारसंघात सन २०१४ मध्ये तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या हनुमंत जगदाळे यांनी निवडणूक लढविली होती. सन २०१९ मध्ये काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, २०१९ नंतर आपणच येथे मोठा भाऊ असल्याचा दावा करीत निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुरूषोत्तम पाटील, महेंद्र पवार, गजानन चौधरी, दीपक क्षत्रिय या चौघांनी तर ओवळा माजिवडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मधुर राव आणि राणी देसाई यांनी पक्षश्रेष्ठींना गळ घातली आहे.
अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या स्वा. सावरकरनगर सार्वजनिक उत्सव मंडळ, आपल्या ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारे व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर आगळावेगळा देखावा साकारणार आहे. शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ‘ठाणे बदलतंय’ या वर्षभर चालणाऱ्या ‘ठाणे बदलतंय’ प्रचार-प्रसार उपक्रमाची सुरवात शनिवारी, ७ सप्टेंबर ते मंगळवारी, १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे,ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी, हौशी स्वभावाचे आहेत. शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे.ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतीशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहेत. आतातर, ठाणे हे स्थानक एक गजबजलेले रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे, येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे. या देखाव्यात ठाणे शहरातील नवीन विविध पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे मार्गांचे जाळे,ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळण साधनं, होऊ घातलेला महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, घोडबंदर रोड, भिवंडी-बायपास, शहरांतर्गत मेट्रो मार्ग, आगामी मेट्रो मार्ग यांमुळे वडाळा, मीरा रोड, कल्याणसारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क, ठाण्यातील निवासी मालमत्ता, येऊर हिल्स, निसर्ग, डोंगरराजी, पाणवठे, ३५ तलाव, २१ एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क, वागळे इस्टेस्टचा इंडस्ट्रियलपासून कमर्शिअलपर्यंतचा बदल आणि जुन्याची कात टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल… यांचे दर्शन हे या देखाव्याचे खास आकर्षण असेल.तसेच ‘ठाणे बदलतंय’ या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन,राज्य शासन,शासनाचा विविध संस्था महामंडळे, ठाणे महानगर पालिका या सर्वांचे विविध प्रकल्प योजना सुद्धा टीव्ही स्क्रीन, सोशल मीडिया माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत, याच बरोबर, ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे यांचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातूनसुद्धा ‘ठाणे बदलतंय…’ हा विषय घेण्यात आला आहे. समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन दिलीप बारटक्के यांनी केले आहे. यावेळी संजय चिचकर अध्यक्ष, दीपक निकम सचिव, सखाराम अहिरे खजिनदार,अमित निकम योगेश मयेकर,भारती भोसले संजय सुतार रॉकी हिंदुस्तानी उपस्थित होते. 0000
ठाणे- विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी’ अनोखा उपक्रम शहापूर तालुक्यातील जि. प.कानडी शाळेत राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावण…
मनसे उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी ठाणे : घोडबंदर रोडवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी विशेषतः या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांकरता डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती नेमून शालेय बस आणि रुग्णवाहिकांकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली. यासंदर्भात पुष्कराज विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. गुरुवारी घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. कित्येकांनी वाहतुकीत अडकल्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केली. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे काही दुदैवी घटना घडल्यावरच प्रशासन लक्ष देणार का?असा सवाल पुष्कराज विचारे यांनी केला आहे. या परिसरात होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी असे पुष्कराज विचारे यांनी सांगितले. 0000
मुंबई : श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५ च्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…