काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांची मागणी राजीव चंदने मुरबाड : मुरबाड कॉँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यपाल यांना मुरबाड तहसिलदार यांच्या मार्फत शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व खोटा शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन मुरबाड कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व किसान कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, विभागप्रमुख खोपिवली वसंत कराळे, ओबीसी तालुकाउपाध्यक्ष प्रकाश पवार, युवक तालुकाउपाध्यक्ष अमोल चोरघे, तालुका पदाधिकारी दिलीप ठाकरे, समीर कराळे आदीं पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित दिले. राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे त्याचा परिपाक म्हणजे राज्यात सुरु असलेला प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याअनुषंगाणे कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरु असुन शिवद्रोही युती सरकारच्या कमीशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला ही सोडले नाही असे प्रतिपादन तुकाराम ठाकरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणा-या शिवद्रोही भाजपा शिंदे सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे,या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप त्याचा निषेध म्हणुन शिवद्रोही सरकार मधील भ्रष्ट्राचाराचे शिरोमणीं व बोगस शिल्पकार जयदीप आपटे वर देशद्रोहाची कार्यवाही तात्काळ करावी ही मागणी तमाम मुरबाडवासींयाच्या वतीने चेतनसिंह पवार यांनी केली. 000