Month: September 2024

अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई

ठाणे : उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल criminal writ petition नं.२९११/२०२२ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब…

संभाजी ब्रिगेडच्या वाटचालीत पत्रकारांचे मोलाचे योगदान

ठाणे : संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे.त्यामळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकर घेत राहील असेआश्वासन विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिले. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय…

गणेशोत्सवात यंत्रणांनी सजग राहावे

पालिका आयुक्तांचे संबंधितांना आदेश   मुंबई : गणेशोत्सवकाळात सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष द्यावे. उत्सव कालावधीत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी अधिक कार्यतप्तर आणि सजग रहावे. भाविक, नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, जीवरक्षकांची नेमणूक, सार्वजनिक स्वच्छता याकडेही यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा – सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भूषण गगराणी यांनी मंगळवारी जुहू चौपाटी आणि वेसावे चौपाटी आदी ठिकाणी पाहणी केली. गणेशोत्सवानिमित्त विविध स्तरावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता, विसर्जन मार्गावरील वृक्षछाटणी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, असे गगराणी यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलिसांबरोबर समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी. मुख्य रस्त्यांसह लहान रस्ते, गल्ली बोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती आदी ठिकाणी स्वच्छता ठेऊन कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्यांची वारंवारता वाढवावी, असे आदेश गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, विसर्जन स्थळावरील कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदींचा गगराणी यांनी आढावा घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात टाळाटाळ करून त्यांची पाठराखण करणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख अरूण म्हात्रे यांना आयुक्त  डॉ. जाखड यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. पथक प्रमुख म्हात्रे यांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या सूचना, नोटिसा देऊनही ते कारवाईत निष्काळजीपणा करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आयुक्तांनी स्वताहून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईने फेरीवाला हटाव पथकातील कामगार, पथक प्रमुखांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकापासूनचा १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त ठेवा. या भागातील रस्ते, पदपथ नागरिकांचा चालण्यासाठी, वाहन कोंडी मुक्त राहतील यादृष्टीने प्रयत्न करा, असे वारंवार आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी नियंत्रक उपायुक्तांना दिले आहेत. कल्याण बाजारपेठेचे केंद्र आहे. याठिकाणी मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा परिसरातून व्यापारी, नागरिक खरेदीसाठी येतात. नागरिकांना शहरात आल्यावर वाहन कोंडी, फेरीवाल्यांचा त्रास होता कामा नये, असे सतत सांगुनही क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख अरूण म्हात्रे फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई करण्यात टाळाटाळ करत होते. म्हात्रे यांना गेल्या चार महिन्यात चार वेळा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या कृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. फेरीवाल्यांंमुळे शिवाजी चौक, महमद अली रस्ता, रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजून जात आहेत. या कोंडीत वाहने, नागरिक अडकून पडत आहेत. म्हात्रेंचे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल अतिक्रमण नियंंत्रण विभागाच्या उपायुक्तांनी आयुक्त डाॅ. जाखड यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी प्रस्ताव तडकाफडकी मंजूर केला. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, अंधेरी, मस्जिद भागातील आहेत. या फेरीवाल्यांच्या माध्यमातून दरमहा मोठा गल्ला क प्रभाग फेरीवाला हटाव पथकाकडून केला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आयुक्त डाॅ. जाखड यांनी दहा प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांची दर सहा महिन्यांनी चक्राकार पध्दतीने बदली करण्याची नागरिकांची मागणी आहे. एकाच प्रभागात कामगार ठाण मांडून बसतात. फेरीवाला हटाव पथकातील अनेक कामगारांच्या रेल्वे स्थानक, बाजारात आठ ते दहा हातगाड्या असल्याची चर्चा आहे. केंद्रीय पथक सुशेगात दहा प्रभागांमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी राजू शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मुख्यालयात आहे. ते पथक काय काम करते. हे पथक डोंबिवली, टिटवाळ्यात जाऊन फेरीवाल्यांवर कारवाई करते, कल्याणचे फेरीवाले त्यांना दिसत नाहीत का, असे प्रश्न तक्रारदार उपस्थित करत आहेत. फेरीवाले हटविण्याची जबाबदारी साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांची आहे. त्यामुळे अरूण म्हात्रे यांच्या बरोबर या प्रभागाचे शासकीय सेवेतील साहाय्यक आयुक्त, अधीक्षक यांच्यावरही आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरत आहे. पालिकेत वरिष्ठांकडून शासकीय, स्थानिक पालिका कर्मचारी असा दुजाभाव केला जात असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. 00000

 साडेचार वर्षीय मुकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर फुलले हसू

 भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शस्त्रक्रियेसाठी केली ६ लाखांची मदत अशोक गायकवाड   अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावातील सारांश‌ प्रशांत ठाकूर या साडेचार वर्षिय मूकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या बालकावर श्रवणशक्ती सुधारण्यास मदत करणारी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी ६ लाख ८ हजार रुपयांची मदत रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आली आहे‌‌. सोमवारी (दि.२) सारांशच्या आई, वडिलांनी सारांशसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सारांश याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेढेखार येथील सारांश‌ प्रशांत ठाकूर हा बालक जन्मतः मुकबधीर आहे‌. घरची परिस्थिती बेताची असल्याने सारांशच्या पालकांनी त्याच्यावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी तत्काळ हालचाल करीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी मंजूर करीत, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ६ लाख ८ हजार रुपयांचा निधी रुग्णालय‌ प्रशासनाकडे वर्ग केला‌. अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. त्याद्वारे बाहेरील ध्वनिलहरीचे इलेक्ट्रिक ध्वनिलहरीत रूपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते, सारांश यांच्यावर ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या करण्यात आली आहे. कॉक्लियर इम्प्लांटमध्ये दोन मुख्य घटक असतात: एक बाह्य प्रोसेसर आणि अंतर्गत इम्प्लांट. बाह्य प्रोसेसर वातावरणातील ध्वनी कॅप्चर करतो आणि त्यांचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. हे सिग्नल मॅग्नेट आणि स्कॅल्पवर ठेवलेल्या कॉइलद्वारे अंतर्गत इम्प्लांटमध्ये प्रसारित केले जातात. इम्प्लांटचे इलेक्ट्रोड अॅरे शस्त्रक्रियेने कोक्लियामध्ये घातले जाते, श्रवण तंत्रिका उत्तेजित करते, मेंदूला सिग्नल पाठवते. मेंदू या सिग्नल्सचा ध्वनी म्हणून अर्थ लावतो, ज्यामुळे व्यक्तींना भाषण आणि पर्यावरणीय आवाज समजू शकतात. सारांश ठाकूर या मूकबधिर बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ५ वर्ष आतील बालकांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ वर्षांच्या आतील मूकबधिर बालकांच्या पालकांनी जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संपर्क साधावा. पात्र बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शात्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक सहकार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी दिली. 000000

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केले चैत्यभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन

अशोक गायकवाड   मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भीमराव आंबेडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. 000

उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल

 पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व   पनवेल : आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने  गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024  रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे. आदित्यने केलेल्या या  उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आमदार बाळाराम पाटील, नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती नारायण घरत, पनवेल पं.स.सभापती  काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी  यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. =00000000

शिवसेना शिंदे गटाचे मेघनाथ घरत भाजपात दाखल

अनिल ठाणेकर   ठाणे घोडबंदर- बाळकूम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मेघना घरत यांचा भाजप प्रवेश शिवेसना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मेघनाथ घरत यांनी बाळकूम, कोलशेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते. ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मेघनाथ घरत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, संजीव नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधारीला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करत असतो करतही राहू परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती ची गरज असते तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो’. 000000000

ठाणे शिवसेनेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२४ चे आयोजन-  नरेश म्हस्के

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२४ आयोजित केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा…

वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातील रस्त्यांवरून १२ बेवारस वाहने हटवली

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या नौपाडा परिमंडळात रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी या कारवाईच्या पहिल्या दिवशी वागळे…