राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आमदार प्रताप सरनाईक सन्मानित
अनिल ठाणेकर ठाणे : विधान परिषद व विधानसभा सदस्यांच्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळ्यात, आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१ या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते विधान परिषद व विधानसभा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यात मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१ या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर , विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे तसेच विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ००००००००
‘संविधान जागर यात्रा’ ६ सप्टेंबरला मुंबईत दाखल
रमेश औताडे मुंबई :संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित ” संविधान जागर यात्रा ” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती. ती संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे संयोजक नितिनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत जळगाव मध्ये दखल झाली. जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी सहा हजार किलोमीटर चा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे असे मोरे यांनी सांगितले. समारोप साठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 0000
मीरा भायंदरचे आयुक्त राजकीय व्यासपीठावर
भायंदर मधील इंद्रलोक परिसरात होणारं स्मृती उद्यानाला स्थानिकांचा विरोध झाल्यावर आमदार प्रताप सरनाईकांनी निर्णय फ़िरवला. त्या संदर्भात त्यांच्या कार्यालयात स्थानिकाची सभा घेण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून स्थानिकांचं म्हणणं त्यांनी…
सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा
अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन कल्याण : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून घ्यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे. 000000

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अॅथलेट चमकले
मुंबई : मुंबई शहर जिल्हा जूनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य…
कोळसा विक्रीतून सरकार मालामाल
कोळशाच्या विक्रीतून सरकारने मोठी कमाई केली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये सरकारने कोळसाविक्रीतून वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारी तिजोरीमध्ये आणली आहे. हा पैसा सरकारी कोळसा कंपनी ‘कोल इंडिया लिमिटेड’ने…
विद्यार्थ्यांच्या चिंताजनक आत्महत्या
भारतातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. मागील आठवड्यात नॅशनल क्राईम ब्युरोच्या डेटावर आधारित स्टुडंट्स सुसाईड : अन अपेडेमिक स्वीपिंग इंडिया नावाचा अहवाल वार्षिक आयसी ३ परिषद आणि…