जिजाऊनगरीत  कुणबी समाज भूषण पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न
अनिल ठाणेकर

 

ठाणे : आपली झेप गल्ली पासून दिल्ली पर्यंत आता न थांबता आपली भरारी ही आता जागतिक असली पाहिजे  . अगदी ग्रामसेवक ते पंतप्रधान कार्यालयाची धुरा सांभाळणारी व्यक्तीही आपली असली पाहिजे तसेच आतंरराष्ट्रीय कंपण्याचे अध्यक्ष आपले असले पाहिजे. आपण मोठी स्वप्ने का नाही पाह्यची ? असे उद्गार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी विक्रमगड येथील जिजाऊनगरीनाध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्यात काढले. याप्रसंगी सुभाष पवार – जिल्हा परिषद उपाध्यक्ष,अशोक वालम-कुणबी एकीकरण समिती अध्यक्ष,रोहिणी शेलार- सभापती महिला व बालकल्याण पालघर जिल्हा, मारुती धीर्डे- शिवसेना जिल्हा प्रमुख , मोनिका मोहन पानवे- भिवंडी लोकसभा प्रमुख, ॲड..महेंद्र माडवकर, दत्ता ठाकरे,प्रकाश भांगरथ, रवी चंदे आदिजण उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी ठाणे पालघरच नाही तर संपुर्ण कोकणातुन मोठ्या संख्येने कुणबी समाज आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कुणबी समाज हा शेतात घाम गाळणारा, वेळ आल्यावर देशासाठी रक्त सांडणारा म्हणून आपली ओळख आहे. आपली परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपत या समाजाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी आणि समाजाच्या एकत्रिकरणासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊनगरी  या ठिकाणी जिजाऊ संघटना व कुणबी एकीकरण समितीच्या वतीने कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील  मान्यवरांचा  सन्मान करण्यासाठी “कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024” हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मानचिन्ह देत त्यांना  सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना सांबरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत जरी पराभाव झाला असला तरी त्या पराभवातूनही आपली ताकत किती हे आपल्याला कळाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासोबत असलेल्या आपल्या सर्व समाजाने तहान भूक विसरून माझा प्रचार केला आहे. मात्र संघटन कमी पडल्याने आपल्याला हार पत्करावी लागली. कुणबी समाज हा अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. शेतात घाम गाळून देशाची भूक मिटवणारा हा समाज आहे. हा समाज मजबूत व संघटीत असणे फक्त तुमची आमची गरज नाही तर राष्ट्राच्या समृद्धी साठी हे गरजेचे आहे. त्यामुळे आता काळाची पावले ओळखून कुठल्याही समाजाला कमी न लेखता आपल्याला सर्वांना सोबत घेऊन संघटीत व्हायचे आहे. असे आवाहन सांबरे यांनी उपस्थितांना यावेळी केले. विक्रमगड तालुक्यातील झडपोली या ठिकाणी  जिजाऊ संघटनेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कुणबी समाज भूषण पुरस्कार सोहळ्यात कोकणातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या कुणबी समाजातील  मान्यवरांचा  सन्मान करण्यासाठी “कुणबी समाज भूषण पुरस्कार 2024” हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उल्लेखनीय व्यक्तिमत्वांना सन्मानचिन्ह देत त्यांना  सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात कुणबी समाजातील विविध क्षेत्रात विशेष लौकीक प्राप्त केलेल्या एकूण २५० व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कुणबी समाजातल्या ज्या ज्या समाजबांधवांनी समाजाला प्रेरणादायी ठरेल असे काम केले अश्या समाजबांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भविष्यात समाजातल्या इतर नवतरुण युवकांनी त्यांचा वारसा पुढे चालवावा यासाठी हा जो सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी आयोजकांचे मनापसून कौतुक आहे असे सांगत माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे देखील कौतुक केले. निलेश सांबरे यांचे कार्य हे समाजाने प्रेरणा घ्यावी असेच आहे. कुठलेही राजकीय पद आणि सत्ता हातात नसतानाही  सांबरे यांचे चालू असलेले काम हे मोठ मोठ्या सत्ताधा-र्यांना देखील शक्य होत नाही. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.यावेळी लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवावर बोलताना जिजाऊ संघटनेचे  अध्यक्ष निलेश सांबरे म्हणाले की मोठ मोठे युती असलेले बलाढ्य प्रस्थापित पक्ष आपल्या समोर लढतीत उभे असतानाही आपल्याला मिळालेल्या मतांचा टक्का हा खूप प्रभावी होता. त्यामुळे ही आपली हार नसून जितच आहे. आता आपल्या समाजाने मोठी स्वप्न बघण्याची वेळ आली आहे.  मात्र कुठल्याही समाजाला न दुखवता आपल्याला आपला समाज घेऊन पुढे जायचे आहे असे प्रतिपादन सांबरे यांनी यावेळी केले. समाजातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरापासून मुख्य न्यायाधीशापर्यंत तसेच  इस्रो (ISRO) पासून मोठ मोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांनमध्ये आपले युवक युवती दिसले पाहिजेत. मोठ मोठे डॉक्टर ते वैज्ञानिकापर्यंत आपल्या समजातली युवापिढी दिसली पाहीजे. तर उद्योगधंद्यांकडे देखील आपल्या युवकांनी आता वळायाला हवे अदानी आणि अंबानीच्या पुढे आपले लोक गेले पाहिजेत . निवडणुका आणि त्यातून मिळणारी सत्ता हे पैसे कमावण्याचे माध्यम नसून  यातून १० टक्के राजकारण आणि ९० टक्के समाजकारण झाले पाहिजे असे मत यावेळी सांबरे यांनी यावेळी व्यक्त केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *