मुंबई : नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
