पनवेल : उरण मतदार संघात आणि पनवेल तालुक्यात येणाऱ्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांतून मंजूर झाले आहे. या कामाचे भुमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून दोन्ही मतदार संघामध्ये विकासकामांची गंगा वाहत असून आगामी काळातही अशाच प्रकारची अनेक विकासकामे या परिसरात होणार असल्याचे सांगितले.
पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विकास कामांचा झंझावात सुरु आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या ७ लाख रुपयांच्या ग्रामविकास निधीमधून डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटी पर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते झाले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, रविंद्र शेळके, डेरवलीचे युवामोर्चा अध्यक्ष शैलेश शेंडे, महेश कनसे, सुनील पवार, विकास सावंत, मनीषा भोर, अतुल भोईर, विनोद शेळके, अर्जुन शेळके, विनेश पाटिल, मितेश दरे, अविनाश भोईर, आकाश भोईर, सुरेश पाटील, राम म्हात्रे, आनंता पाटील, तुलशीराम दरे, दीपक दरे, बालाराम शेंडे, प्रभाकर नाईक, भारत गायकवाड, रोहन पाटील, संदीप बसवेश्वर, विजय घुगे, हरिचन्द्र पाटील, ज्ञानेश्वर दरे, भरत पाटील, अपेक्षा कांबळे, स्वर्धा शेटे, निकिता जाधव, शुक्रिया शेख, रेणुका पाटील, गुडिया त्रिपाठी, शर्यू वराडकर, रूपेश शेंडे, महेश शेंडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि रहिवासी उपस्थित होते. यावेळी अतुल भोईर यांना वाढविसानिमीत्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *