कर्जत : अशोक गायकवाड*
कर्जत तालुक्यात पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया करीता विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. हया विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी कर्जत तालुक्यातील तीन हजार कुक्कुट पक्षी पेक्षा जास्त क्षमतेचे सर्व पोल्ट्री फार्म धारक यांना, विहीत नमुन्यातील अर्ज भरून पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी केले आहे.*
मंगळवारी पशुसंवर्धन विभाग कर्जत यांच्या मार्फत , तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्स्यालय कर्जत येथे कुक्कुट फॉर्म धारक यांच्या करीता विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर मार्गदर्शन शिबिरात, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी , कर्जत तालुक्यातील कुक्कुटपालक/पोल्ट्री फॉर्म धारक यांना पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया, त्याचे महत्व, कुक्कुट पालन-पोल्ट्री फीड-कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाबत शासन निर्णय, इतर संबंधित अपडेट वर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सदर शिबिरात, कर्जत तालुक्यातील कुक्कुट पालक/पोल्ट्री फॉर्म धारक दिपक भगत, अनिल शेमटे, विलास मोडक, दाजी पारधी, प्रतिक घरत, हनुमंत पाटील, किरण पाटील व इतर उपस्थित होते. सदर विशेष मार्गदर्शन शिबिरात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती कर्जत डॉ. मिलिंद जाधव यांनी ही उपस्थित यांना मार्गदर्शन केले. शिबिरात उपस्थित राहिलेल्या पोल्ट्री फॉर्म धारक यांचे पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया करीता विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आले. पशुसंवर्धन विभाग कर्जतचे डॉ. सुवर्णलता मनगुळी, डॉ. आसाराम काळे, श्रीम. सूर्यपंखा पारखे व गणेश निरगुडा यांनी, उपस्थित यांना पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया करीता विहीत नमुन्यातील अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *