३४वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा :

साताराचा प्रसाद बळीप व सांगलीची वेदिका तामखडे सर्वोत्कृष्ट खेळाडू

 

झारखंड : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. किशोर गटाचे सलग ९वे तर किशोरी गटाचे ७वे विजेतेपद आहे. साताराचा प्रसाद बळीप सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्काराचा तर सांगलीच्या वेदिका तामखडे ही इला पुरस्काराची मानकरी ठरले.
महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला.
मध्यंतराला १ गुणांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र संघाने २४-१५ असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघाकडून भीमसिंग वसावे २.०० मी. व१ गडी, श्री दळवी १.१०, ०.५० मी. व १ गडी, प्रसाद बळीप १.००, २.०० मी. व ३ गडी, सचिन थोरात १.१०, १.०० मी. व १ गडी, विनायक भांगे १.२० मी. अशी सांघिक कामगिरी बजावली.
महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८ गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी घेत महाराष्ट्रने २६-८ असा सामना जिंकला. महाराष्ट्र संघाकडून वेदिका तामखडेने पहिल्या पाळीत ५ मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले १.३० मी. ३.५० मी व ५ गडी बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३.०० मी. संरक्षण करताना २ गडी बाद केले तर गौरी जाधवने ३ गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *