मुकुंद रांजणे

 

माथेरान : माथेरानला पाणीपुरवठा करणार ब्रिटिशकालीन शार्लेट लेख या तलावाची गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही याकरता निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना आग्रही असून याबाबत त्यांनी उपोषण ही केले होते परंतु अद्यापही या कामास सुरुवात झाली नसल्याने त्याबाबत आज माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासन श्री राहुल इंगळे यांना याबाबत लेखी निवेदन देऊन विचारणा करण्यात आली.
गेल्या अनेक पावसाळा सुरुवात होताच येथील शार्लेट लेक या तलावाची स्वच्छता करण्याची वर्षाने वर्षे पद्धत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून या तलावाची स्वच्छताच करण्यात आलेली नाही त्यामुळे तलाव मध्ये दगड मातीचा गाळ मोठ्या प्रमाणात साचला असून त्याचा परिणाम तलावाच्या बंधार्‍यावर होत आहे हा तलाव ब्रिटिशकालीन असल्याने त्याचा बांध आता कुमकुवत होऊ लागला आहे त्याला अनेक ठिकाणी आता गळतीही लागायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच या गाळ काढणे हे बंदराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे हेच पाणी माथेरान मध्ये पिण्यास वापरत असल्याने हा बंधारा स्वच्छ होणे ही येथील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी काळाची गरज आहे परंतु हा गाळ साफ होत नसल्याने हे पाणी माथेरानकरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे, या गाळा मुळे या तलावाची पाणी साठवण क्षमताही कमी झालेली आहे मग माथेरानला दरवर्षी मे महिन्यामध्ये पाणीटंचाई सामोरे जावे लागते त्यामुळेच हा बंधारा स्वच्छ होणे हे आता गरजेचे झाले आहे व या करता शासनाने 4:13 कोटी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून या बंधाऱ्याची सुरक्षितता त्याची स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण यासाठी हा निधी वापरला जाणार आहे परंतु आता पावसाळा संपत आला असून भंडारा ही तुडुंब भरला आहे त्यामुळे याची स्वच्छता होणे शक्य नाही त्यामुळेच निसर्ग पर्यटन शाल असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष कदम यांनी याबाबत माथेरानचे मुख्याधिकारी श्री राहुल इंगळे यांना याबाबत विचारणा केली व त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सध्या हा विषय सनियंत्रण समितीकडे सोपविला असून त्यांच्या परवानगी नंतर त्या कामात सुरुवात होईल व टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण केली जातील असे यावेळी श्री राहुल इंगळे यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस जगदीश कदम पालिकेचे लेखापाल श्री अंकुश इचके हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *