निलेश सांबरे यांच्याजिजाऊने वचनपूर्ती !
अनिल ठाणेकर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड भिवंडी ग्रामीण आणि नुकतेच शहापूर तालुक्यात आसनगाव,खर्डी वासिंद आणि किन्हवली या ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या सेवेसाठी मोफत चार आरोग्य क्लिनिकांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.याद्वारे लोकसभेच्या निवडणुकीत आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनांची निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेने वचनपूर्ती केली !
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण कला क्रीडा शेती या क्षेत्रात जोमाने कार्य सुरू आहे. त्या सामाजिक कार्याच्या जोरावर 98 टक्के समाजकारण आणि दोन टक्के राजकारण या धोरणाने निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष विरोधात समोर असताना अपक्ष उमेदवारी दाखल केली. लोकसभा प्रचारादरम्यान अनेक विधानसभा क्षेत्रात फिरत असताना निलेश सांबरे यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांच्या पदरी पराभव आला अगदी केंद्रीय मंत्र्याला सुद्धा त्यांच्यामुळे पराभव पत्करावा लागला. पराभूत होवून सुध्दा त्यांनी सेवेचे व्रत सोडले नाही. निलेश सांबरे यांच्या भगिनी जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांचा वाढदिवस २३ जून रोजी कल्याण पश्चिम शहरात २३ उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.दिवसेंदिवस बेरोजगारी व महागाईचे प्रमाण वाढत आहे याचा फटका सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात बसत आहे खाजगी दवाखान्यात अवाजवी खर्च काढून केली जाणारी लुटमार त्यामुळे अनेक गरीब रुग्ण हे उपचाराविना दगावत आहेत त्याचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं म्हणून कुठलाही रुग्ण हा उपचार विना दगावता कामा नये या शुद्ध हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोफत १३० बेडचा सुसज्ज मल्टी स्पेशलिटी रुग्णालय चालवत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड भिवंडी ग्रामीण आणि शहापूरा तालुक्यात आसनगाव,खर्डी वासिंद आणि किन्हवली या ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या सेवेसाठी मोफत चार आरोग्य क्लिनिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना याचा अधिक फायदा होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे, शहापूर तालुक्यातील अनेक विभागातून आलेले जिजाऊ संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
000000
