कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची निवेदन

सोयगाव :सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असतांना पीकविमा कंपनी ने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा वितरणाची रक्कम कमी स्वरूपात दिली असल्याचा थेट कंपनी वर आरोप करत तातडीने तालुका तक्रार निवारण समिती ची बैठक लावण्यात यावी व या गैरप्रकारांची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन गुरुवारी सायंकाळी चार वाजता तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांना दिले. सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ असूनही पीकविमा कंपनीने विम्याच्या रक्कम देण्यासाठी हात आखडता घेत हेक्टरी पाच ते सहा हजार रु याप्रमाणे पिकविम्या ची रक्कम शेतकऱ्यांना खात्यात वर्ग केली आहे.
यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त या प्रमाणात पिकविम्या ची रक्कम दिली.
यामध्ये खूप व्हेरिअशन असून इ पिकपाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या ७२ तासांच्या केलेल्या तक्रारी फेटाळून लावत या शेतकऱ्यांना पिकविम्या पासून वंचीत ठेवले आहे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तातडीने तालुका तालुका तक्रार निवारण समिती ची बैठक घ्यावी व पूर्ण विमा खात्यात वर्ग करावा अशी मागणी केली आहे निवेदनावर दिलीप पाटील, कृषिभूषण रविंद्र पाटील,श्रीराम नारायण पाटील, श्रीराम तुकाराम पाटील, नरेंद्र पाटील,डॉ अविनाश पाटील,दिलीप महाजन, गोपाळ पाटील राजेंद्र पाटील प्रणव पाटील,विनोद सुरेश पाटील राजू पाटील आदींसह तीनशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *