photo-3

 

मुंबई : राज्यस्तरीय अजिंक्यपद ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा कोनगाव  येथे संपन्न झाली. या स्पर्धेत १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील, २०वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात सामने झाले. या स्पर्धेमध्ये “मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ” येथील ९ पैलवानांची निवड पुढे होणाऱ्या राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याच्या मनस्वी राऊत, कविता राजभर, आदर्श शिंदे, ओम जाधव, विशाल जाधव, सूरज माने, कोमल पटेल, डॉली गुप्ता यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महेश ढगेचा दुसरा क्रमांक लागला.

श्री गणेश आखाड्यातील पै. प्रवीण वाकडे याने शालेय बुलढाणा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. आता त्याची निवड विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता झाली आहे. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *