इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला रामराम करीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची भूमिका असते. त्यामुळे आम्ही आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशीही चर्चा झाली त्यांना माझ्या निर्णयाची कल्पना दिली. शरद पवारांच्या चर्चेनंतर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतोय असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात समर्थकांचा जाहीर मेळावा घेतला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. मी गुरुवारी सिल्व्हर ओकला शरद पवारांना भेटायला गेलो. तिथे दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. फोनवरून जयंत पाटीलही होते. तुम्ही आमच्या पक्षात यावं असा आग्रह पवारांनी धरला अशी माहिती त्यांनी दिली.

त्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जावं होता. त्यामुळे मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केला. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *