माथेरान : गावातील काही भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने काही ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक सावधगिरी बाळगून गावातील भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या सूचनेनुसार जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.

गावातील उघडी गटारे आणि त्यातूनच वाहून जाणारे सांडपाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसलेल्या नागरिकांनी उघड्या गटारात टाकलेल्या ओल्या कचऱ्यामुळे सुध्दा डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांना आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू सारखे आजार बळावले तर एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी स्वच्छता राखणे हे नागरिकांचे सुध्दा कर्तव्य आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा वेचक महिला नियमितपणे कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करीत असतात परंतु जे नागरिक अनेकदा घरातील कचरा उघड्या गटारात टाकत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास वचक बसून स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *