राजीव चंदने
मुरबाड : ‘मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, पाणी,आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि मी आमदार झालो तर मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार’, असे प्रतिपादन शैलेश वडनेरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केले आहे, मुरबाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भिमाईचे जन्म स्थान आहे. आज पर्यंत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील आंबेटेबें येथील भिमाई भुमीला भेट दिली नसून भीमअनुयायीनां उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे,असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) उमेदवार शैलेश वडनेरे यांनी उपस्थित पत्रकारांना चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर सर्वप्रथम भिमाई भुमीचा विकासाचा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही,तसेच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्रा मधील अनेक वाडया पाड्यात रस्ते झाले नाही,विज पुरवठा मध्ये चाललेला सावळा गोधळ,पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक रखडले विकास काम पहिल्यांदा करणार असे दै, बित्तंबातमीशी बोलताना सांगितले.
