जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेदेवी मंदिरात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सेवेसाठी आमदार महेश बालदी यांनी मोफत चहापाण्याची व्यवस्था करून दिली आहे. दांडफाटा येथील टाकेदेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या अनुषंगाने दमदार आमदार म्हणून प्रसिद्ध असेलेले आमदार महेश बालदी यांनी नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडफाटा येथे टाकेदेवी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी  मोफत चहा पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे.  भाविकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून भाविकांकडून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *