नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने तुर्भे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत अरविंद मनोहर ठोंबरे, घर क्र. 122, सेक्टर – 05, सानपाडा गांव, सानपाडा, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रत्यक्ष ठिकाणी स्थळ पाहणी केली असता अंदाजे 750 चौ.मी. मोजमापाच्या क्षेत्रफळात विनापरवानगी अनधिकृतरित्या आर.सी.सी. स्वरुपात बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेलीहोती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते.
तथापि, सदर जागा ही सिडको प्राधिकरणाच्या मालकीची असल्याने मा.अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) तथा मुख्यनियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको, यांना उक्त नमुद ठिकाणी असलेली अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे निष्कासन कार्यवाहीचे सिडको प्राधिकरणमार्फत नियोजन करावे. सदर निष्कासन कार्यवाहीकरीता नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक ते सहकार्य करेल असे पत्र देण्यात आलेले होते.
त्याअनुषंगाने, सिडकोमार्फत सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संयुक्त कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
सदर मोहिम  सहाय्यक आयुक्त, भरत धांडे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे. तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदारआणिअतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.
वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता 01 जे.सी.बी., 03इलेक्ट्रीकहॅमर, 02गॅसकटर,08मजूरयांचा वापरकरण्यातआलाआहे.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *