ठाणे : उत्तेजक द्रव्ये आणि नको असलेल्या प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची वाढत्या वयात जाणीव करून देण्यासाठी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेतर्फे पाचव्या ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी दुपार आणि सायंकाळ अशा दोन सत्रात होणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख संयोजक विनायक केतकर म्हणाले, उत्तेजक द्रव्य हि क्रीडाक्षेत्राला लागलेली मोठी कीड आहे. उदयोन्मुख क्रीडापटूंना याची ओळख आणि माहिती लहान वयातच करून द्यायला पाहिजे. त्यामुळे ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेने खेळाडूंमध्ये जागृती करण्यासाठी या शरीरसौष्ठ्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. हि स्पर्धा सात विविध गटात रंगणार असून त्यात वय वर्षे १०, ११ ते १५, १६ ते २०, २१ ते २५ , खुला वर्ग उंची १६५ सेंटीमीटर पर्यंत, १६५ ते १७० सेंटीमीटर आणि १७० सेंटीमीटरवरील आदी गटांचा समावेश आहे. घंटाळी येथील ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या शाळेतील सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल . स्पर्धेच्या प्रवेशिका आणि स्पर्धकांचे उंचीमापन १३ ऑक्टोबरला रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत केतकर हाऊस, बेडेकर रुग्णालयाजवळ, राम मारुती मार्ग, नौपाडा ठाणे पश्चिम येथे स्वीकारल्या जातील .अधिक माहितीसाठी विनायक केतकर यांच्याशी ९९८७५५०८७७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
00000