श्रीकांत शिंदे मिञ मंडळ नेतृत्वाखाली दिव्यात सहा ठिकाणी रास गरबा
ठाणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्त दिवा शहरात नऊ रंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांनी मंडप सजावट, साउंड सिस्टिम, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य आयोजित करून तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे. तसेच दिवा शिवसेनेचे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात एकूण पाच ते सहा ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे. साबेगाव येथील डिजे कंपाऊंड, तर दिवा पश्चिमेस क्रिश कॉलनी, दिवा-आगासन रोड येथील सदगुरू नगर, दत्तनगर व एन आर नगर, या ठिकाणी आयोजन केले आहे. तसेच यावर्षी महिला व तरुणींना उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू व तसेच दररोज पैठणी जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे. नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात सुरू आहे असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.