ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांनी व प्रभागातील मा. नगरसेवक दर्शना चरणदास म्हात्रे , मा. नगरसेवक सुनीता मुंडे, मा. नगरसेवक दीपक जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याचे कोंक्रीटीकरण करून संपूर्ण रस्ता आर सी सी स्वरूपात करण्यात आला आहे त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त करत सर्वाचे आभार मानले आहे. दिव्यातील अनेक रस्त्यांचे कोंक्रीटीकरण झाले असून काही रस्त्यांची काम देखील प्रगतीपथावर आहेत तेही लवकरच पूर्ण होतील असे मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बोलताना स्पष्ट केले.
0000