अनिल ठाणेकर
ठाणे : १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये पार पडणा-या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक पूर्व सर्वे केले असता त्या दरम्यान मतदार यादीमधील अनेक चुका आढळून आल्या आहेत. आम्ही केलेल्या सर्वेनुसार या मतदार संघामध्ये असलेल्या यादी क्र. १ ते ३९२ बूथ (एकूण मतदार ४,४३,३३१) मध्ये जवळ-जवळ ३१,२३४ दुबार मतदारांची नावे आम्हांला आढळून आली असल्याबाबत त्या नावांवर आम्हांला हरकत असून ती दुबार नावे तात्काळ वगळण्यात यावीत अशा आशयाचे पत्र आम्ही १८ जुलै, मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांना दिले. त्यानंतर ६ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये आम्हांला ३०,८१२ दुबार नावे आढळली त्यानंतर हरकती नोंदविण्याच्या कालावधीमध्ये आम्ही ९ ऑगस्ट, २०२४ रोजी पुन्हा मतदार नोंदणी अधिकारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्राद्वारे या याद्यांमध्ये आढळलेली ३०,८१२ दुबार नावे वगळण्याबाबची विनंती केली. अंतिम मतदार यादी दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर देखील आम्ही पुन्हा सर्वे केला असता; आजही त्या मतदार याद्यांमध्ये यादी क्र. १ ते ४०९ (एकूण मतदार ४,६८,२५२) मध्ये २४,२२६ दुबार मतदार आहेत. आम्ही मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, आम्ही १८ जुलै, २०२४ व ९ ऑगस्ट, २०२४ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ५,८८४ दुबार नावे वगळण्यात आल्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला असल्याची तोंडी माहिती त्यांनी दिली. तसेच २७ सप्टेंबर, २०२४ रोजी मा. मा. उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांना पत्राद्वारे यादी क्र. ३७७ ते ४०९ या याद्यांमध्ये १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदार देखिल नोंदविण्यात आल्याची लेखी तक्रार आम्ही केली आहे. तसेच ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी यादी क्र. ३७७ ते ४०९ मधील याद्यांवर निवडणूक विभागाचे BLO यांच्याबरोबर राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेमलेले BLA यांनी या याद्यांचा सर्वे करुन मतदारांची तपासणी करावी अशा प्रकारचे देखिल पत्र दिले आहे, त्याबाबतही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी आजही यादी क्र. १ ते ४०९ मध्ये असलेली २४,४२६ दुबार नावे वगळण्याबाबत उप-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघ यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे.१४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी क्र. १ ते ४०९ मध्ये, एकूण मतदार ४,६८,२५२ पैकी २४,४२६ दुबार मतदार आहेत. ही नावे निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तीनदा निवडून आलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचरी काम करीत आहेत, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बोलताना दिली आहे.
चौकट
डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.ज्या माणसावर किडनॅपिंग चा गुन्हा आहे, ज्या माणसावर स्री शक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे.मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को व खोटी पिटाची केस करण्याचा षड्यंत्र रचण्याचा आरोप आहे. यांनी तरी दुसऱ्याला नावे ठेऊ नयेत.आम्हीही त्यांना कुठल्या ना कुठल्या नावाने बोलु शकतो पण माझ्यावर ते संस्कार नाहीत. नवरात्रीचा मंगलमय पर्व चालू आहेत. करोडो हिंदूंचे आस्था असलेले प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य ते करु शकतात, विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जे फाडू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचे ? ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात, भाषा,मर्यादा सोडून बोलणे हा त्यांचा गुण आहे.पण जनाची नाही पण मनाची लाज त्यांनी दुसऱ्याला नावे ठेवताना त्यांनी दाखवायला हवी, अशी अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हवी असे मला वाटत नाही, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले.
००००
