एक्झिट पोलची ‘एक्झिट’

चंढीगड : एक दोन नव्हे तर विविध संस्थानी केलेल्या तब्बल १२ एक्झिट पोलमध्ये भाजापाचा पराभव दाखविला जात असताना आज मोदीं है तो मुमकीन हैची जादू हरिणायात पुन्हा पहायला मिळाली. भाजपाने दणदणीत बहुमत मिळवित हरयानात विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली.

हरियाणा विधानसभेमध्ये भाजपने ९० पैकी ४८ जागा जिंकत बहुमताचा ४६ हा आकडा गाठला. तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानाव लागले. राष्ट्रीय लोकदलाला २ जागा जिंकता आल्या तर ३ अपक्ष निवडूण आले.

शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं चित्र होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय. आणि एक्झिट पोलची एक्झिट करून टाकली

निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपनं मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे. हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी १२ ऑक्टोबरला होऊ शकतो.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या ७ महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खरे तर भाजपने २०१९ मध्येही खट्टर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले.

२०२४ मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे निवडणुकीच्या ७ महिने आधी खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली आणि एका नव्या चेहऱ्याने जनतेसमोर हजर झाले. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात जल्लोष

हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष सुरू झाला. हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटतोय. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय. भाजपा मुख्यालयात आज पेडे वाटून हरियानाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *