डोंबिवली – अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. पाण्याच्या टाक्यांचे कुठे उभारायच्या ही बाब निश्चित नव्हती. ज्या जागांचा सर्व्हे होता त्या जागा ताब्यात नव्हत्या, अशा अनेक अडचणी समोर होत्या. सगळं अंदाधुंद काम सुरु होते. ढिसाळ नियोजन व काही नी खोडा घातल्याने हे काम थंडावले. मात्र आत्ता कामाची परिस्थिती समाधान कारक असून येत्या एप्रिल पर्यंत अमृत योजना कार्यान्वीत होईल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र या कामात दिरंगाई होत असल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी योजनेच्या कामावर प्रश्न उपस्थित करीत ही कामे जलद गतीने पार पाडली जावीत यासाठी पाठपुरावा केला आहे. बुधवारी आमदार राजू पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत सुरु असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली. सध्या सुरु असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. या कामा दरम्यान ढिसाळ नियोजन आणि मुद्दाम कामे थांबविली गेल्याने ही योजना संथ गतीने सुरु होती याकडे त्यानी लक्ष वेधले. आत्ता ज्या प्रकारे कामे सुरु आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वीत होईल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हरियाणीतील जादू महाराष्ट्रात चालते का पहावे लागेल. हरियाणा येथील निवडणूक निकालावर बोलताना आमदार पाटील म्हणाले, हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणूक पाहता जम्मू काश्मीर मध्ये निकाल अपेक्षित होता. पण हरियाणात भाजप येईल असे वाटले नव्हते. हरियाणात भाजपने काय जादू केली आहे, ते माहीत नाही. महाराष्ट्रात ही जादू चालते का हे पाहावे लागेल असे ते म्हणाले.
