अनिल ठाणेकर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी, कळव्यातील मफतलाल मैदानात यंदा प्रथमच माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.*
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी कळवे पू. येथील मफतलाल मैदानात, आतकोनेश्वर नगर नंबर१ येथे सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत माता की चौकी या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे, स्थानिक खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर सुप्रसिद्ध भोजपूरी लोकगायक शिवम पांडेय, सुप्रसिद्ध लोकगायिका ममता उपाध्याय व खुशबू दुबे यांचे विशेष आकर्षण असणार आहे. तरी आपण सहकुटुंब या भक्तिपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.
