मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. मधुकर व कै. मनमोहन आठल्ये आणि कै. ए. एस. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मनोहर पटवर्धन आणि सारंग फगरे यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर अथर्व आठल्ये आणि संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे साथ देतील. हा युवा महोत्सव सर्वांसाठी खुला असून यावेळी अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००
