00000

 

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील किंवा पूर्ण होणार असतील अशा सर्व विद्यार्थ्यांकडून मतदान नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आला. जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे गरजेचे आहे. त्याकरिता आपण मतदार यादीत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *